Lasalgaon Market : 'या' काळात लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव राहणार बंद

लासलगाव : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवार २८ मार्च ते मंगळवार ०१ एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद राहणार आहे. मात्र या काळात भाजीपाला व द्राक्षेमणी या नाशवंत शेतमालाचे लिलाव नियमित सुरु राहतील अशी माहिती बाजार समिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.



लासलगाव व्यापारी असोसिएशनने लासलगाव बाजार समिती प्रशासनास दिलेल्या पत्रानुसार शुक्रवार दिनांक 28.03.2025 रोजी व्यापारी वर्ग बाहेरगावी जाणार असल्याने तसेच शनिवार दिनांक 29.03.2025 रोजी शनि अमावस्या,रविवार दिनांक 30.03.2025 रोजी साप्ताहिक सुट्टी,सोमवार दिनांक ३१मार्च २०२५ रोजी रमजान ईद तसेच मंगळवार दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी बँक व्यवहार बंद असल्यामुळे असे एकूण पाच दिवस लासलगाव बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद राहणार असुन,यादरम्यान शेतकऱ्यांनी कांदा व भुसार माल बाजार समितीत विक्री साठी आणु नये असे आव्हान बाजार समिती कडुन करण्यात आले आहे.दिनांक २ एप्रिल २०२५ पासुन बाजार समितीतील कांदा व भुसार मालचे लिलाव पुर्ववत होतील याची सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी.


सध्या शेतकरी कांदा काढणी करत असून तो लगेच बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.लासलगाव सह जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे परंतु आता सलग पाच दिवस बाजार समितीत कांद्याचे लिलाव होणार नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण होणार आहे.

Comments
Add Comment

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ