Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराच्या कवितेवरून राजकारण तापलं

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन समय रैना वादानंतर कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा याने आक्षेपार्ह कविता सादर केली. कवितेचा हा व्हिडीओ पाहून शिवसैनिकांच्या तळपायातील आग मस्तकात गेली. त्यांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली.




मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल कामराने महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्यावर भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेतून निशाणा साधला. उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामराचा कविता सादर करतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. "कुणाल की कमाल. जय महाराष्ट्र", असं संजय राऊत व्हिडीओसोबत म्हणाले आहेत. त्यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत मंत्री उदय सामंत यांनी कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. "पूर्ण गाणं ऐकून आमचे आमदार कुणाल कामरावर एफआयआर दाखल करण्याच्या मनस्थितीत आहेत. एकनाथ शिंदे यांची बदनामी करणारे ते गाणे असेल आणि अशा पद्धतीने कुणी गाणं गाणार असेल तर आम्ही आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कुणीही ऐकून घेणार नाहीत. त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्याची मागणी करु", अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली आहे. कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडीओ पाहून संतापलेल्या शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली. दरम्यान या घटनेचे पडसाद विधानसभेत पडणार का हे पाहण महत्त्वाचं ठरेल.




काय म्हणाला कुणाल कामरा ?


"ह्यांचं हे राजकारण आहे. परिवारवाद संपवायचा होता, कुणाचा बाप चोरुन घेतला. काय रिप्लाय असेल? मी उद्या तेंडुलकरच्या मुलाला भेटू का की, चल भाई जेवण करुयात. तेंडुलकरचं कौतुक करतो आणि सांगतो, भाई आजपासून तो माझा बाप", असं कुणाल कामरा कविता सादर केल्यानंतर मिश्किलपणे म्हणाला.

Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,