बस चालवत मोबाईलवर मॅच बघणाऱ्या चालकाला एसटीने केले बडतर्फ

मुंबई : बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या खासगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ केले. हा चालक ज्या कंपनीकडून एसटीकडे रुजू झाला होता त्या खासगी कंपनीला एसटी महामंडळाने पाच हजार रुपये एवढा दंड ठोठावला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईतील दादर येथून २१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता स्वारगेट (पुणे) साठी निघालेल्या खासगी ई-शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळा जवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत असलेले चित्रीकरण संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले. याबाबत मंत्री सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खासगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहन चालवल्याप्रकरणी बडतर्फ केले असून संबंधित खाजगी संस्थेला पाच हजार रुपये एवढा दंड ठोठावला आहे. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, ई-शिवनेरी ही एसटीची मुंबई -पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठीत बस सेवा आहे. या बसमधून अनेक सन्माननीय व्यक्ती प्रवास करीत असतात. " अपघातविरहित सेवा " हा या बस सेवेचा नावलौकिक आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांचा एसटीच्या या प्रतिष्ठित सेवेबद्दल विश्वास दृढ होत जाईल! तसेच भविष्यात एसटीकडे असलेल्या खाजगी बसच्या चालकांना संबंधित संस्थेकडून वेळोवेळी शिस्तबद्ध वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
Comments
Add Comment

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ