महायुतीच्या पाच उमेदवारांचा विधान परिषदेत बिनविरोध विजय, दोन्ही सभागृहात महायुतीचे वर्चस्व

मुंबई : विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या पाच उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला. या उमेदवारांनी विधान परिषदेत सदस्यत्वाची शपथ घेतली. यामुळे विधान परिषदेतील सदस्यांची संख्या आता ५७ झाली आहे. विधान परिषद (ज्येष्ठांचे सभागृह किंवा वरचे सभागृह) आणि विधानसभा (कनिष्ठांचे सभागृह किंवा खालचे सभागृह) या दोन्ही ठिकाणी महायुतीचे निर्विवाद वर्चस्व आहे.



रिक्त झालेल्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे तसेच शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके हे पाच जण बिनविरोध विजयी झाले. बिनविरोध विजयी झालेल्या या पाच उमेदवारांनी विधान परिषदेत सदस्यत्वाची शपथ घेतली. आता विधान परिषदेत भाजपाचे २२, शिवसेनेचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ आणि ३ अपक्ष आमदार असे महायुतीचे एकूण ४० सदस्य आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या शिउबाठाचे ७, काँग्रेसचे ७, शरद पवारांच्या राशपचे ३ असे मविआचे एकूण १७ सदस्य आहेत. विधान परिषदेच्या २१ जागा रिक्त आहेत.



विधानसभेत भाजपाचे १३२, शिवसेनेचे ५७, राष्ट्रवादीचे ४१, जनसुराज्याचे २, राष्ट्रीय युवा स्वाभिमानचा १, राष्ट्रीय समाज पक्षाचा १, राजर्षी शाहू विकास आघाडीचा १, अपक्ष २ असे महायुतीचे एकूण २३७ सदस्य आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या शिउबाठाचे २०, काँग्रेसचे १६, शरद पवारांच्या राशपचे १०, समाजवादी पक्षाचे २, एमआयएमचा १, मार्क्सवादी कम्युनिस्टांचा १, शेकापचा १ असे मविआचे एकूण ५१ आमदार आहेत.



राज्याच्या विधान परिषदेतील पाच आमदारांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर विधानसभेचे आमदार झालेल्या पाच जणांनी विधान परिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या होत्या. याच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. आमश्या पाडवी, प्रविण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे पाच विधान परिषदेचे सदस्य आता विधानसभेचे आमदार झाले आहेत. या पाच जणांच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. निवडणुकीत महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध विजयी झाले.
Comments
Add Comment

SIR Voter List: पश्चिम बंगाल, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही विरोधकांचे 'एसआयआर'कडे दुर्लक्ष

- भाजपकडून ९४ टक्के मतदान केंद्रांवर बीएलए नियुक्त; मनसे, शरद पवार गट, उबाठामध्ये उदासीनता मुंबई : पश्चिम बंगाल

Kirit Somaiya : मुंबईतील 'एसआयआर' मोहिमेत मृत मतदारांची नावे वगळण्याच्या प्रक्रियेत तफावत

- किरीट सोमय्यांचा आरोप; निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील विशेष संक्षिप्त

Ashwini Bhide : सर्व परवानाधारक फेरीवाले वापरत असलेल्या क्षेत्रफळांची पाहणी करा, अतिक्रमित असेल तर कारवाई करा

- महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांवरील अधिकृत फेरीवाल्यांनी परवाना

Science Centre Metro Station : सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी कोस्टल रोड प्रोमेनेडपर्यंत भुयारी पादचारी मार्ग

टीओडी अंतर्गत केला जाणार विकास, प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून केला जाणार खर्च एमएमआरसीएलच्या

Kandivali Fire : कांदिवलीत हॉटेलजवळ आग; 11 जणांची सुखरूप सुटका

मुंबई : मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात सोमवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. कांदिवली स्टेशन रोडवरील अभिराई

BMC : मुंबई महापालिकेचे नगरसेवक आता हायटेक

विविध समित्यांचे अजेंडा आता त्यांच्या मोबाईलवर प्रस्तावांच्या छपाईसह वितरणावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च