'लिटिल ग्रेसी' इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

  56

मुंबई : भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारपेठेतील आघाडीची कंपनी असलेल्या झेलिओ ई मोबिलिटीने त्यांचे नवीनतम मॉडेल, लिटिल ग्रेसी, या कमी वेगाच्या, नॉन-आरटीओ इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण केले आहे. ही इ स्कूटर विशेषतः १०-१८ वयोगटातील तरुण रायडर्ससाठी तयार करण्यात आली आहे. या नवीन लॉन्चने कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये एक उल्लेखनीय भर घातली आहे आणि त्यात सुरक्षितता आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करून तरुण लोकसंख्येला लक्ष्य करण्यात आले आहे. लिटिल ग्रेसीला ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नसल्यामुळे, ही स्कूटर एक विश्वासार्ह, पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर वाहतुकीचा मार्ग शोधणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांसाठी एक आदर्श पर्याय आहे.

लिटिल ग्रेसी तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असून या इ स्कूटरची किंमत ४९,५०० रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ४८व्ही/३२एएच लीड अ‍ॅसिड बॅटरीची किंमत ४९,५०० रुपये असून ती ७-८ तासांच्या चार्जिंग वेळेसह ५५-६० कि.मी. ची रेंज देते. ६०व्ही/३२एएच लीड अ‍ॅसिड बॅटरीची किंमत ५२,००० रुपये असून ७-९ तासांच्या चार्जिंग वेळेसह ७० कि.मी. ची रेंज देते. तर ६०व्ही/३०एएच लीथियम-आयन बॅटरीची किंमत ५८,००० रुपये असून ८-९ तासांच्या चार्जिंग वेळेसह ७०-७५ कि.मी. ची रेंज देते.

झेलिओ ई मोबिलिटी लिमिटेडचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक कुणाल आर्य म्हणाले, "लिटिल ग्रेसीच्या लाँचिंगसह, आम्ही असे उत्पादन सादर करण्यास उत्तेजित झालो आहोत, जे केवळ शैलीदार आणि क्रियात्मक नाही तर तरुण रायडर्ससाठी टिकाऊ वाहतूक देखील सुलभ करते. आमचे ध्येय हे, नेहमीच भारतातील दैनंदिन जीवनाचा एक भाग, इलेक्ट्रिक मोबिलिटी बनवणे हे राहिले आहे आणि लिटिल ग्रेसी ही, आम्हाला त्याकडे एक पाऊल जवळ घेऊन जाते. ही एक पर्यावरणपूरक, परवडणारी आणि परवान्याची गरज नसलेली स्कूटर आहे, जी आमच्या तरुण रायडर्सच्या विशिष्ट गरजा पूर्ण करते, त्याच वेळी नावीन्यपूर्णता आणि शाश्वततेसाठी आमची वचनबद्धता बळकट करते."

प्रत्येक मॉडेल हे ४८/६०व्ही बीएलडीसी मोटरने सुसज्ज असून त्याचे वजन ८० किलो आहे, आणि त्याची लोडिंग क्षमता ८० किलो आहे. २५ कि.मी./तास कमाल वेग आणि प्रति चार्ज फक्त १.५ युनिट वीजेच्या वापरासह, लिटिल ग्रेसी ही,कमी अंतराच्या प्रवासासाठी एक कार्यक्षम आणि किफायतशीर असलेला उपाय आहे. या स्कूटरमध्ये डिजिटल मीटर, यूएसबी पोर्ट, चावीविरहित ड्राइव्ह, अँटी-थेफ्ट अलार्मसह सेंटर लॉक, रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच आणि ऑटो-रिपेअर स्विच अशा आधुनिक सुविधा आहेत. यामध्ये हायड्रॉलिक सस्पेंशन, पुढील आणि मागील दोन्ही बाजूंना ड्रम ब्रेक्स देखील समाविष्ट आहेत आणि ते गुलाबी, तपकिरी/क्रीम, पांढरा/निळा आणि पिवळा/हिरवा या चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

लिटिल ग्रेसीमध्ये मोटर, कंट्रोलर आणि फ्रेमवर दोन वर्षांची वॉरंटी देखील आहे, ज्यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रिक क्रांतीचा अंगीकार करताना मनःशांती मिळते.

तिच्या स्थापनेपासून, झेलिओ ई मोबिलिटी भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारपेठेत लवकरच आघाडीवर आली आहे. २,००,००० हून अधिक समाधानी ग्राहक आणि देशभरात ४०० पेक्षा अधिक डीलरशिपच्या नेटवर्कसह, हा ब्रँड वेगाने आपला विस्तार करत आहे. २०२५ च्या अखेरीस १००० पेक्षा अधिक डीलरशिप करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, जे देशभरातील ग्राहकांना पर्यावरणपूरक आणि परवडणाऱ्या मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करण्याच्या तिच्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा पुष्टी करते.
Comments
Add Comment

महालक्ष्मी रेसकोर्सवर 'इव्हेंट जॅकपॉट' महापालिकेने कमावले तब्बल ७.५ कोटी!

मुंबई : मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर बीएमसीने कमाईची 'रेस' लावली आहे. जुलै २०२४ पासून मुंबई महापालिकेने

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांची आयसीटीला १५१ कोटींची देणगी म्हणाले....

प्रतिनिधी: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) ला तब्बल

Apple WWDC News: नवा आयफोन घेताय मग थांबा....  नव्या खरेदीपूर्वी हे वाचा....

मुंबई: ॲपल डब्लूडब्लूडीसी (Apple WWDC) चा कार्यक्रम ९ जूनला कॅलिफोर्निया कलिफमध्ये होणार आहे. वर्षातील सर्वात मोठा

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Gold Loan News: सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आता सोने तारण कर्ज अधिक मिळणार आरबीआयच्या 'या ' निर्णयानंतर कर्जदारांची दिवाळी

प्रतिनिधी: सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. छोट्या छोट्या लघू कर्जदारासाठी आरबीआयने सरलतेचे दरवाजे