आता व्हॉट्सअ‍ॅपवरून रिक्षा-टॅक्सी चालकांबाबबत तक्रार करता येणार

मुंबई: प्रवाशांना नियमबाह्य भाडे आकारणे, भाडे नाकारणे तसेच गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा - टॅक्सी तसेच ओला -उबर चालकांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हाट्सअप क्रमांक प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रवाशांनी आपल्या गैरसोय बाबत या क्रमांकावर प्रवाशांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते वांद्रे पूर्व मतदारसंघातील बांद्रा, खार व इतर रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा व टॅक्सी चालकांच्या अरेरावी संदर्भात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार वरुण सरदेसाई व मोटार परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांनी बांद्रा, खार अंधेरी या रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना रिक्षा व टॅक्सी चालकांची अरेरावी सहन करावी लागते. हे चालक नियमबाह्य पद्धतीने भाडे आकारतात, गैरवर्तन करतात, तसेच अनेक प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यास नकार देतात. या संदर्भात परिवहन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली.


या वेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, मोटार परिवहन विभाग व वाहतूक पोलीस यांनी मिळून एक संयुक्त पथक नेमावे ज्या भागात अशाप्रकारे प्रवाशांना रिक्षा चालकाकडून त्रास होतो तेथे वारंवार ग्रस्त घालावी. तसेच प्रादेशिक विभाग निहाय हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित न करता पूर्ण मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हाट्सअप क्रमांक प्रदर्शित करावा व त्याला व्यापक प्रसिद्धी द्यावी. जेणेकरून प्रवासी आपल्या तक्रारी संबंधित व्हाट्सअप क्रमांकावर करतील.



तक्रार असलेल्या रिक्षा अथवा टॅक्सी चालकाला परिवहन विभागाने नोटीस पाठवणे आवश्यक असून तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन गरज पडल्यास त्याचा परवाना देखील रद्द करण्याची कारवाई करावी, असे निर्देश परिवहन विभागाला मंत्री श्री. सरनाईक यांनी दिले.

Comments
Add Comment

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट

भायखळा-सायन स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी ब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : सायन (शीव) आणि भायखळा अशा दोन रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलाच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून