Nagpur News : नागपुरातील दंगली दरम्यान महिला पोलीस कर्मचारीसोबत घडला धक्कादायक प्रकार

नागपूर : नागपुरातील (Nagpur) भालदारपुरातील ही बातमी आहे. नागपुरात सोमवारी (दि १७) रात्री झालेल्या दंगलीत नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या खाकी वर्दीत असलेल्या महिला पोलिसांवर विनयभंग झाला असल्याची बातमी मिळाली आहे. या प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला.




छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. या आंदोलनामध्ये मुस्लिम प्रतिकांचा अवमान केल्याचा आरोप करीत आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलिसांकडे केली. अफवा पसरल्यामुळे सायंकाळी महाल येथे तणाव वाढला. चिटणीस पार्कजवळ काही असामाजिक तत्त्वांद्वारे जोरदार दगडफेक करण्यात आली. वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. यात पोलिस, अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी झाले. या दंगली दरम्यान एका जमावाने महिला पोलिसाला पकडले. तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करीत अश्लील चाळे केले. वेळीच महिला पोलिसाने स्वत:ची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर जमावाने पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली.दरम्यान या गुन्हेगारांवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. (Nagpur)

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास