मुंबई : मुंबईत (Mumbai) दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असून यातील ७०० दशलक्ष लिटर पाणीचोरी होते. ही पाणी चोरी रोखण्यासाठी पाइपलाइनमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे कंट्रोल रूममध्येच कळेल की पाणीचोरी, गळती कुठे होते, कोणी अतिरिक्त जोडणी केली आहे की नाही. ही यंत्रणा तयार करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला देण्यात येतील, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत सदस्य राजहंस सिंह यांनी मुंबईतील अपुरा पाणीपुरवठा आणि विविध भागांत होणारी पाणी चोरी थांबवावी, अशी मागणी लक्षवेधी मांडून केली. ते म्हणाले, मुंबईतील लोकसंख्या वाढत आहेत. त्यांना पाणीपुरवठा कसा करणार. त्यात कुर्ला, मानखुर्द, मालवणीमध्ये पालिका कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पाणीचोरी होते. मार्च महिन्यांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे यावर काय उपाययोजना करणार, असा सवाल सिंह यांनी केला. मुंबईत दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा जास्त करावा लागणार आहे.
त्यासाठी २०१३ साली गारगाई प्रकल्प विकसित करण्याला मुंबई महापालिकेने परवानगी दिले होते. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी चार वर्षे लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईला अंदाजे ४४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य करणारा पायलेट प्रकल्प मुंबई महापालिका राबवणार होती. त्यासाठी महापालिकेने ४०० कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे ४०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून मुंबईची पाणीटंचाई दूर करा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. त्यावर हे अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात येऊन प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला देण्यात येईल, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…