Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजविधिमंडळ विशेषमहत्वाची बातमी

UPSC प्रमाणेच MPSC मध्ये डिस्क्रिप्टीव परीक्षा होणार

UPSC प्रमाणेच MPSC मध्ये डिस्क्रिप्टीव परीक्षा होणार
मुंबई : लवकरच एमपीएससीच्या माध्यमातून मोठी भरती निघणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. भरतीसाठी एमपीएससीत नवे बदल केले जात असल्याचेही ते म्हणाले. एमपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळत नाही, या मुद्द्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी एमपीएससीचा देखील अभ्यास करुन परीक्षा देऊ शकतात यासाठी डिस्क्रिप्टीव परीक्षेचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.



एमपीएससी केलेल्यांची भरती सुरू आहे. फक्त १४ जणांची भरती कागदपत्रांच्या त्रुटीमुळे रखडली आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यूपीएससी प्रमाणेच एमपीएससी वेळापत्रक आधीच जाहीर करते. पण आरक्षणावरुन न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यामुळे २०१८ - १९ पासून सातत्याने एमपीएससीच्या वेळापत्रकात बदल करावा लागत आहे. वेगवेगळ्या आरक्षणाच्या प्रश्नांमुळे न्यायालयाचे निर्णय येतात, कधी एसीबीसीचा निर्णय येतो, कधी इडब्यूएसचा विषय येतो, कधी इडब्यूएसमधून एसबीसीचा विषय येतो, मग त्यात वेगवेगळ्या न्यायालयातून ज्या स्थगिती येतात त्यामुळे हा जास्त वेळ लागतो. पण पुढच्या काळात आपला प्रयत्न असेल की यूपीएससी प्रमाणे एमपीएससीसाठीही योग्य प्रकारचे वेळापत्रक तयार करावे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.



महाराष्ट्रात २०२३ मध्ये डिस्क्रिप्टीव एमपीएससी आणली होती. पण सर्व विद्यार्थ्यांनी विनंती केली म्हणून २०२५ पासून डिस्क्रिप्टीव परीक्षा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. एमपीएससीने तो निर्णय घेतला आहे. एमपीएससी या वर्षापासून डिस्क्रिप्टीव परीक्षाच घेणार आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचं त्यांना समर्थन आहे. काही विद्यार्थ्यांचा विरोध देखील आहे. तो विरोध आपण या ठिकाणी ग्राह्य धरणार नाही. कारण आपल्या विद्यार्थ्यांचं त्यामुळे यूपीएससीत नुकसान होतं. यूपीएससीत डिस्क्रिप्टीव आहे. एमपीएससी डिस्क्रप्टीव राहिली नाही तर आपले विद्यार्थी एकाचवेळी एमपीएससी आणि यूपीएससी अशी दोन्ही प्रकारची तयारी करू शकणार नाही; असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यूपीएससी प्रमाणेच एमपीएससी डिस्क्रिप्टीव केल्याचे सांगितले.



एमपीएससीत पेपर सेंटीग स्वत: एमपीएससी करते. आपण काही इन्फ्रास्ट्रक्चर बाहेरचं घेतो. बाकी सगळं एमपीएससीच्या माध्यमातून होतं. आपल्याला माहिती आहे, एमपीएससीने सुदैवाने गेल्या काही वर्षांमध्ये पारदर्शी पद्धतीने परीक्षा घेण्याचा उपक्रम चालवलेला आहे. कुठलाही गोंधळ झालेला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.



एमपीएससीत ज्या तीन जागा रिक्त आहेत त्यातील एक भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. इतर दोन जागांसाठी जाहिरात देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढच्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवायची आहे. ती वेळेत झाली पाहिजे याकरता आपल्या जेएडी सेवा, सचिवांना जबाबदारी दिली आहे. त्यांनी सर्व राज्यांचा आणि यूपीएससीचा अभ्यास केलेला आहे. आपण रिस्ट्रक्चरिंगचं प्रपोजल तयार करत आहोत. वर्ग एक, वर्ग दोन यासोबतच वर्ग तीनही आपण एमपीएससीला दिलेले आहेत. एमपीएससीचं रिस्ट्रक्चरिंग सुरू आहे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Comments
Add Comment