Maharashtra ST Bus : मुंबई सेंट्रल एसटी स्थानकातून लालपरी पुन्हा धावणार

मुंबई : चाकरमान्यांसाठी आनंदवार्ता समोर आली आहे. (Maharashtra ST Bus)  मागील अडीच महिन्यांपासून एसटी वाहतुकीसाठी बंद असलेले मुंबई सेंट्रल एसटी स्थानक पुन्हा सुरू होणार आहे. आता वाहतूक पूर्ववत होण्याचा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Mumbai Central Bus Depot) या स्थानकाचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या १७ मार्च पासून येथून एसटी गाड्या पुन्हा धावणार आहेत. सध्या मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या एसटी गाड्या कुर्ला नेहरूनगर, दादर, परळ आणि पनवेल स्थानकातून धावत आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) निधीतून स्थानकाच्या काँक्रीटीकरणाचा हा खर्च होत आहे. मुंबई सेंट्रल स्थानक आगारातील काँक्रीटीकरणाचे काम २३ डिसेंबर २०२४ पासून सुरू झाले होते. ते १३ मार्च रोजी पूर्ण झाले. काँक्रीटीकरणामुळे मुंबई सेंट्रल येथे पूर्ण होणाऱ्या फेऱ्या अन्य स्थानकांत वळवण्यात आल्या होत्या. आगार आणि बस स्थानक परिसरात क्राँकीटीकरणाचे काम सुरू असल्याने सेंट्रल येथून प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना परळ, दादर, कुर्ला नेहरूनगर स्थानकात जावे लागत होते. हा प्रवास त्रासदायक ठरत असल्याची अनेक प्रवाशांची तक्रार होती. आता मात्र प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

रडार स्थलांतराला केंद्राची संमती; दहिसर-जुहू परिसरातील पुनर्विकासाला मिळणार गती

मुंबई : दहिसर आणि जुहू (डी.एन.नगर) येथील उच्च वारंवारता रडार केंद्रांमुळे रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी

दहिसर–जुहू रडार स्थलांतर आणि Housing for All; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाचं निवेदन

मुंबई : मुंबईतील तील रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी ‘Housing for All’ अंतर्गत नवीन धोरण मांडण्यात आले आहे. फनेल

मुंबईत मुली बेपत्ता होण्यावर राज ठाकरेंचा सवाल; मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईत मुली आणि लहान मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचा

मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी सरकारचे मोठे पाऊल!

मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर राबवणार 'क्लस्टर रिडेव्हलपमेंट'; पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड

कल्याण ते नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास जलद होणार

डोंबिवली एमआयडीसी मेट्रो स्टेशनजवळ १०० वा यू - गर्डरची यशस्वीरीत्या उभारणी मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास

मेट्रो सिनेमा भुयारी मार्गात हवा खेळती राहणार

सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने बांधण्यात आलेल्या मेट्रो सिनेमा भुयारी मार्गातील हवा खेळती राहावी