नाशिक : मनमाड शहरातील चांदवड रोड लगत असलेल्या व्यापाऱ्याच्या कांदा शेडला आग लागून त्यात शेकडो क्विंटल कांदा जळून खाक झाला आहे. व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या नंतर कांदा शेड मध्ये साठवून ठेवला होता. आगीत कांद्यासोबत शेडपण जळून खाक झाल्यामुळे व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री कोणीतरी आग लावल्याचा संशय या व्यापाऱ्याने व्यक्त केला असून याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असुन अनेक ठिकाणी आग लागज्याच्या घटना समोर येत आहेत.
मनमाडला देखील चांदवड रोडवर व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला लाखो रुपयांचा साठवून ठेवलेल्या कांदा गोदामाला आग लागली असुन या आगीत लाखो रुपयांचा कांदा व कांदा शेड जळून खाक झाले आहे रात्रीच्या वेळी कोणी तरी आग लावल्याचा संशय व्यापाऱ्याने केला आहे. याबाबत मनमाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पूढील तपास पोलिस करत आहेत.
सध्या कांद्याला जास्त भाव नसला तरी बाहेर देशात पाठवण्यात येणाऱ्या कांद्याला चांगला भाव आहे. यामुळे अनेक व्यापारी हे कांदा विकत घेऊन साठवून ठेवतात व त्यानंतर तो बाहेर देशात पाठवतात यासाठी अनेक व्यापारी कांदा चाळीत किंवा मोठ्या गोडावून मध्ये आपला साठा करून ठेवतात असेच साठवुन ठेवलेले कांदे जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…