PMPML बसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

  57

पुणे : शहरातल्या प्रवाशांना सुलभ प्रवासाचा आनंद घेता यावा म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) बसमध्ये ‘पुढील थांबा उद्घोषणा’ ही स्वयंचलीत प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ, अपंग, दृष्टीहीन, महिला प्रवाशांना या सुविधेचा फायदा होणार आहे.

त्यानुसार ‘पीएमपी’च्या चार हजारांहून अधिक थांब्यांचे उद्घोषणा करणारे ध्वनीमुद्रणाचे (ऑडिओ रेकाॅर्डींग) काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या यंत्रणेची चाचणी होणार असल्याची माहिती ‘पीएमपी’ प्रशासनाकडून देण्यात आली.



सार्वजनिक वाहतूक सेवेत मेट्रो, रेल्वे, आणि विमान प्रवाशांसाठी स्वयंचलित घोषणांची सुविधा उपलब्ध हे, मात्र अद्याप ‘पीएमपी’मध्ये या सुविधेचा अभाव आहे. त्यामुळे अनेकदा दृष्टिहीन, अपंग आणि वृद्ध प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होणे, नियोजित थांबा ओळखण्यात अडचणी निर्माण होणे, ज्यामुळे थांबे चुकणे, असे प्रकार होत आहे.
Comments
Add Comment

‘पाच नवीन पोलीस स्टेशनला मान्यता देणार’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पुणे : पुणे शहरासाठी लोहगाव, लक्ष्मीनगर, नऱ्हे, मांजरी, येवलेवाडी अशा

कुत्रा चावल्याने म्हैस दगावली, रेबीजच्या भीतीने १८२ जणांनी लस घेतली

नांदेड : मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका म्हशीचा मृत्यू झाला. ही

नागपूर मधून धावणार तिसरी वंदे भारत एक्सप्रेस : पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

नागपूर : अजनी (नागपूर) ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ येत्या १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

पुण्यातल्या साडेतीन लाख शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद करण्याचे आदेश

पुणे : गेल्या सहा महिन्यांपासून अंत्योदय; तसेच प्राधान्य योजनेतून धान्य न उचलणाऱ्या ३ लाख ३३ हजार

Eknath Shinde : "स्वाभिमान गहाण ठेवल्याची शिक्षा; काँग्रेसनेच दाखवली जागा, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला"

मुंबई : दिल्लीच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत घडलेला एक प्रसंग सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चेचा

Ajit Pawar : "अजित दादांची मिश्किल टिपणी: ‘मी जेवायला आलो तर बिल घेऊ नका’… असं का म्हणाले अजित दादा?

पुणे : पुण्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चाकण आणि परिसरातील वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष