विरोधामुळे विवाहित महिलेची प्रियकरासह आत्महत्या, १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदगाव : प्रेमसंबंधांच्या विरोधात वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून विवाहित महिला आणि तिच्या प्रियकराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नस्तनपूर (ता. नांदगाव ) येथील श्री शनिदेव मंदिराजवळ घडली. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली १६ जणांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.


फिर्यादी गोविद नवनाथ मिटके (रा. भाटगाव, ता. येवला, जि. नाशिक) यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची बहीण उज्वला रामकृष्ण खताळ (रा. वंजारवाडी, ता. नांदगाव) हिचे त्याच गावातील ज्ञानेश्वर माधव पवार याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गावातील काही लोकांनी त्यांच्या नात्याला विरोध करत त्यांना वारंवार आत्महत्या करा अन्यथा ठार मारू, अशी धमकी दिल्याने त्या मानसिक छळाला कंटाळून दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


व्हॉट्सअॅप आत्महत्येची माहिती मॅसेजमधूनदि. ११ मार्च २०२५ रोजी रात्री८.५० वाजता उज्वलाने तिच्या भावाला व्हॉट्सअॅपवर एक चिठ्ठी पाठवली. त्यात तिने आत्महत्येस जबाबदार असलेल्या १६ जणांची नावे स्पष्टपणे नमूद केली होती. त्या चिठ्ठीमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, या व्यक्तींनी तिला आणि तिच्या प्रियकराला धमकावत, त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. घटनेची माहिती समजताच फिर्यादी गोविद मिटके आणि त्यांचे नातेवाईक मनमाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले. मात्र, तिथे त्यांना माहिती मिळाली की, उज्वला आणि ज्ञानेश्वर या दोघांनी नस्तनपूर शनिदेव मंदिराजवळ रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता, दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय, नांदगाव येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले.


या प्रकरणी उज्वला व ज्ञानेश्वर यांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या १६ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींची देखील चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे. अरुण उर्फ मधुकर रामा गायकवाड, संदिप वाल्मीक सावंत, प्रकाश वाल्मीक सावंत, नवनाथ मारुती जाधव, संतोष माधव पवार, अनिल राधू दखने, संजय मारुती सोनवणे, रोहिदास मारुती सोनवणे, सोपान सुर्यभान गुंडगळ, सुनिता ज्ञानेश्वर पवार, सोनल संतोष पवार, जन्याबाई छबू गुंडगळ, नितीन सुभाष घाडगे (रा. मनमाड), सतिष उर्फ बाल्या दत्तू जाधव, बाळू सटवा गोसावी, छगन दादा साठे या सोळा जणांविरुद्ध नांदगाव पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर करीत आहे.

Comments
Add Comment

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने