Non-Creamy Layer Limitation : नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढणार!

मुंबई  : राज्य सरकारकडून क्रिमिलेअरची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली असून ही मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी शिफारस केली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य राजेश राठोड यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना इतर मागास बहुजन कल्याण मंत्री सावे बोलत होते. राज्यातील एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने क्रिमिलेअरची मर्यादा वाढविण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला होता. त्यानंतर, आता फडणवीस सरकारच्या काळात केंद्राकडे या संदर्भात शिफारस करण्यात आली आहे.



नॉन क्रिमिलेअरची मर्यादा आठ लाखांवरून १५ लाख रुपये करण्यासंदर्भात केंद्र सरकारला राज्य सरकार शिफारस करणार असल्याची माहिती या पूर्वीच देण्यात आली होती. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या संदर्भातील निर्णय घेतला होता.

Comments
Add Comment

पाण्याची गळती आणि दुषित पाणी समस्येवर लक्ष द्या, आयुक्तांचे जल अभियंता विभागाला निर्देश

मुंबई : मुंबई उत्तर मुंबईतील पाण्याच्या समस्येबाबत महापालिका आयुक्तांसोबतच लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या

मुंबई आशियातील 'आनंदी' शहर!

टाइम आऊट सर्वेक्षणात पहिले स्थान; ८७% नागरिक खूश नवी दिल्ली: मुंबईला २०२५ साठी आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून

गोराईत उभारले जाणार भारतातील पहिले मॅग्रोव्ह पार्क

उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या पुढाकाराने साकारणार प्रकल्प मुंबई : भारतातील पहिले ‘मॅंग्रोव्ह-थीम

अमिताभ बच्चन यांनी विकले २ आलिशान फ्लॅट्स; १२ कोटींना झाला व्यवहार

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथे असलेले त्यांचे दोन लक्झरी फ्लॅट्स विकले

मुंबई महापालिकेचे प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने ५ जणांना चिरडले!

मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, रेल्वे कर्मचा-यांच्या आंदोलनाने घेतले बळी, दोष कुणाचा? मुंबई :