Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाIndian Cricketers : मुंबई इंडियन्सच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये झळकणार मराठी अभिनेता

Indian Cricketers : मुंबई इंडियन्सच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये झळकणार मराठी अभिनेता

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला. आता देशातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या टी२० लीग स्पर्धेला म्हणजे IPL ला सुरुवात होणार आहे. २२ मार्चपासून IPL 2025च्या हंगामला सुरूवात होणार आहे. या हंगामासाठी सर्व संघ तयारी करत आहेत.दरम्यान, मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक प्रमोशनल व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये झळकला आहे. चाहत्यांनाही उपेंद्र लिमयेचा हा मुंबई इंडियन्सवाला व्हिडीओ खास पसंतीस उतरतो आहे.

विधिमंडळ परिसरातील ‘रोजा’साठी अडवला रस्ता

मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या प्रमोशन साठी दरवर्षी सोशल मीडियावर कायमच काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतो. गेल्यावर्षी त्यांनी काही मुंबईकर सोशल मीडिया इन्फ्युएर्सना घेऊन IPL कॅम्पेन केलं होतं. यावर्षीसाठी आता मुंबई इंडियन्सच्या एका प्रमोशनल व्हिडीओ मध्ये मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये दिसला आहे. उपेंद्र लिमयेने अँनिमल या लोकप्रिय चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसारखाच लूक या व्हिडीओ पोस्टमध्येही दिसत आहे. मुंबई इंडियन्सच्या नव्या व्हिडीओ पोस्ट मध्ये उपेंद्र लिमये हार्दिक पांड्याच्या एन्ट्रीबद्दल खास त्याच शैलीत बोलताना दिसतोय. त्याच्या आवाजाची फेक आणि त्याला लूक पाहून चाहत्यांनी उपेंद्र लिमयेचं पुन्हा एकदा खास कौतुक केलं आहे.

बुमराहच्या तंदुरुस्तीबाबत महत्त्वची बातमी समोर आली आहे. ही बातमी मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का मानला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराह आयपीएल २०२५च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही. बुमराह सध्या बेंगळुरूमधील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. पण तो आयपीएल २०२५ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात खेळू शकणार नाही. याचा अर्थ तो अजूनही गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. बुमराह एप्रिल महिन्यातच मुंबई इंडियन्सच्या संघात सामील होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -