मुंबई : आली रे आली होळी आली… होळी आणि रंगपंचमी सणाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. होळी हा सण संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केली जाते. रंगपंचमीच्या दिवशी सर्व ठिकाणी एकमेकांना रंग लावला जातो. याशिवाय पाण्याच्या पिचकाऱ्या, बंदुकी, हर्बल रंग इत्यादी अनेक गोष्टी आणल्या जातात. पण होळी खेळताना एकमेकांना रंग लावताना कोण कोणाला कोणता रंग लावेल हे सांगता येत नाही. अनेकदा होळीचे रंग केसांमध्ये अडकून राहतात आणि त्यामुळे केस लवकर खराब होतात. त्यामुळे होळी खेळताना स्वतःच्या आरोग्याची त्वचा आणि केसांची काळजी घेणे जास्त आवश्यक आहे. अनेकदा होळीच्या केमिकलयुक्त रंगांमुळे केस आणि त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. केमिकलयुक्त रंगांमुळे त्वचा आणि केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. केमिकलयुक्त रंगाचा वापर करण्याऐवजी हर्बल आणि नैसर्गिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या रंगाचा वापर करावा. यामुळे केस आणि त्वचेचे नुकसान होणार नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला होळी खेळताना केसांची कशी काळजी घ्यावी? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यामुळे केसांचे कोणतेही नुकसान होणार नाही आणि केस निरोगी राहतील.
रंगपंचमी खेळताना या पद्धतीने घ्या केसांची काळजी
- होळी खेळण्याआधी केस आणि त्वचेच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. अन्यथा केसांचे नुकसान होऊन केस कोरडे आणि निस्तेज होतील.
- होळी खेळायला जाण्याआधी केसांना भरपूर तेल लावावे. केसांना तेल लावल्यामुळे केसांचे नुकसान होणार नाही. याशिवाय केसांच्या मुळांपासून ते अगदी शेवटच्या टोकापर्यंत सगळीकडे केसांना व्यवस्थित तेल लावावे. यामुळे केसांच्या मुळांमध्ये थेट रंग जाणार नाही.
- होळी खेळायला जाताना केस मोकळे सोडून जाऊ नये. यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. केमिकलयुक्त रंगाचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे होळी खेळायला जाताना वेणी किंवा घट्ट अंबाडा बांधून ठेवला तर जास्त उपयोगी ठरेल.
- होळी खेळायला जाताना रंग लावून उन्हात जाणे टाळावे. ऊन आणि केमिकलयुक्त रंगांमुळे केसांचे जास्त नुकसान होते.
- होळी खेळायला जाताना डोक्यात कोणी रंग टाकला तर डोक्यात लगेच पाणी टाकावे. यामुळे केसांमधील रंग लगेच निघून जाईल आणि केस काही प्रमाणात स्वच्छ होतील. याचा केस आणि डोक्यावर कोणताच परिणाम दिसून येणार नाही.
- रंग खेळून आल्यानंतर केसांमधील रंग स्वच्छ करण्यासाठी शँम्पूचा जास्त वापर करू नये. शँम्पूच्या अतिवापरामुळे केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. केस तुटणे किंवा केसांमध्ये कोंडा होऊ शकतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.