उष्माघात टाळण्यासाठी महापालिकेने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
मुंबई : उन्हाळी ऋतू तसेच तापमानाच्या वाढत्या पाऱ्यांमुळे उष्माघातासारखे प्रकार होऊ नये यासाठी, मुंबई महानगरपालिकेने उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.(Mumbai Weather Update) मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जाणवत असलेल्या उष्ण लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या काळात काय करावे? काय करू नये याबाबतच्या सूचना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार नियमित करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
Ladki Bahin Yojna 2025 : लाडक्या बहिणींना दरमहा मिळणार १५०० रुपयेच!
सद्यस्थितीत मुंबईसह राज्याच्या काही भागांमध्ये तीव्र उष्ण लाट जाणवू लागली आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ही परिस्थिती ११ मार्च २०२५ पर्यंत राहू शकते. त्याचप्रमाणे मार्च आणि एप्रिल महिन्यात अशी परिस्थिती वारंवार उद्भवू शकते. उष्ण लहरींची परिस्थिती वारंवार उद्भवण्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या काळात काय करावे, काय करू नये, याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. येत्या काळात उष्णतेची संभाव्य लाट आणि उष्माघात यासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी दिले आहेत.