मुंबई : शहरात महिलांविरुद्ध आणि मुलींविरुद्धच्या घडलेल्या गुन्ह्यांमध्ये २०२४ मध्ये वाढ झाली आहे. गेल्यावर्षी मुंबई बलात्कार, विनयभंग आणि बालकांच्या लैंगिक अत्याचाराचे ४७८९ गुन्हे दाखल झाले. २०२३ च्या तुलनेत यात वाढ झाली आहे. बलात्कार, विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत मुंबईत दरदिवसाला १३ गुन्ह्यांची नोंद होत आहे. मुंबई पोलिसांच्याआकडेवारीनुसार, २०२४ मध्ये मुंबईत १०५१ बलात्काराच्या घटना घडल्या तर २०२३ मध्ये ९७३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. गंभीर बाब म्हणजे परिचीत व्यक्तीकडून झालेल्या बलात्काराच्या घटनेत गुन्ह्याची उकल होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवरून ९४ टक्क्यांवर घटले आहे. याशिवाय विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्येही गेल्यावर्षी वाढ झाली. शहरात २०२३ मध्ये २०५५ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यात २०२४ मध्ये वाढ होऊन २३९७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दरम्यान २०२३ व २०२४ मध्ये विनयभंगाच्या गुन्ह्यांत आरोपी अटक होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे.शहरातील महिला व अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्येही वाढ झाली असून मुंबई २०२३ मध्ये महिला व अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ११६७ गुन्हे दाखल झाले होते. २०२४ मध्ये याच काळात १२३१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
गंभीर बाब म्हणजे अल्पवयीन मुले व मुली यांच्याविरोधात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मुंबईत २०२४ मध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत १३४१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२३ पोक्सो कायद्या अंतर्गत ११०८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२४ मध्ये मुंबईत पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये ६०९ बलात्कार, ६६७ विनयभंग व ३५ छेडछाड-अश्लील शेरेबाजी केल्याच्या घटनांचा समावेश आहे. २०२३ मध्ये अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांतील ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. २०२४ मध्ये या प्रमाणात घट झाली असून २०२४ मध्ये हे प्रमाण ९६ टक्के होते. याशिवाय विनयभंग व छेडछाड-अश्लील शेरेबाजी या गुन्ह्यांच्या उकल होण्याच्या प्रमाणही अनुक्रमे १०० टक्क्यांवरून ९७ टक्के व ९६ टक्क्यांवरून ९१ टक्क्यांपर्यंत घटले.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…