सोलापूर : उजनी धरणातून ६ मार्चपासून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले असून २५ मेपर्यंत कालव्याचे पाणी सुरू राहणार आहे. साधारणतः १६ टीएमसी पाणी (सलग दोन आवर्तने) त्यासाठी लागणार आहे. सध्या कालव्यातील पाण्याचा विसर्ग २१०० क्युसेक करण्यात आला असून दोन दिवसांत मोहोळ तालुक्यातून पाणी पुढे मार्गस्थ होणार आहे. सध्या उजनी धरणात एकूण ८८.३० टीएमसी पाणी असून त्यात २४.६० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
Maharashtra Budget 2025 : संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराजांचे तर आग्र्यात शिवरायांचे स्मारक
सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शेतीपिकांना पाण्याची गरज आहे. जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरला उजनी धरणाचे पाणी थेट मिळते. दरम्यान, मागील तीन वर्षांत यंदा पहिल्यांदाच शेतीसाठी तीन आवर्तने, त्यातही ऐन उन्हाळ्यात सलग दोन आवर्तने सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय मुंबईत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून कालव्यातून सुरवातीला ७०० क्युसेकने सोडलेले पाणी सध्या २१०० क्युसेक करण्यात आले आहे.