मंत्री नितेश राणे यांच्या क्रियाशीलतेची मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिली पोहोच
मत्स्य व बंदरे विकास खात्याला आतापर्यंतची अर्थसंकल्पात सर्वात जास्त तरतूद
मुंबई : निर्णय क्षमता आणि कामाचा उरक असलेल्या मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला अर्थसंकल्पात सरकारने फार मोठी तरतूद करून दिली आहे. बंदरे विकासासाठी ४८४ कोटी तर मत्स्य व्यवसायासाठी २४० कोटींची तरतूद केली आहे. दोन्ही खात्यांचे मिळून ७२४ कोटी रुपये ची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी या रकमेची मांडणी विधानसभेत केली आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या कामाला प्रोत्साहन दिले आहे. या दोन्ही खात्यांची अर्थसंकल्पातील आत्तापर्यंतची ही सर्वात जास्त तरतूद आहे. बंदरे आणि मत्स्य व्यवसाय खात्याला प्रथमच एवढी भरघोस तरतूद करण्यात आली आहे.
मत्स्य व्यवसाय वाढीसाठी तसेच बंदर विकासासाठी मंत्री नितेश राणे यांनी गेल्या शंभर दिवसाच्या कालावधीत फार मोठ्या प्रमाणात काम सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या त्यांच्या कामाची दखल घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरीव तरतूद करण्यासंदर्भात निर्णय घेतला आणि तशा पद्धतीने अर्थसंकल्पात तो दिसून आला. बंदरे विकासासाठी ४८४ कोटी तर मत्स्य व्यवसायासाठी २४० कोटी असे मिळून ७२४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात अनेक कामाचा समावेश होणार आहे. बंदर विकासाबरोबरच मच्छीमारांचे प्रश्न सुद्धा या माध्यमातून सूचना आहेत.