नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि आरजे महवश (RJ Mahvash) यांच्या डेटिंगच्या अफवा सध्या जोरात आहेत. याचे कारण म्हणजे, २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात (Champions Trophy) न्यूझीलंडवर टीम इंडियाने चार विकेटने मिळवलेल्या विजयानंतर महवशने विनोदाने स्वतःला टीमसाठी “गुड लक” म्हणून संबोधले.
आरजे महवशने (RJ Mahvash) हा सामना पाहतानाचे काही खास क्षण इंस्टाग्रामवर शेअर केले. तिच्या पोस्टमध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयानंतरच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ आहे. जिथे ती आणि युजवेंद्र चहल एकत्र जल्लोष करताना दिसत होते. तिने सामन्यानंतरच्या आतषबाजीचा फोटोही शेअर केला. शेवटच्या स्लाइडमध्ये महवश खेळादरम्यान कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसली.
View this post on Instagram
या पोस्टला आरजे महवशने (RJ Mahvash) कॅप्शन दिले आहे की, “कहा था ना जीता के आऊंगी. आय अॅम गुड लक फॉर टीम इंडिया.”
Rohit Sharma : ‘रोहित खेळू शकतो २०२७ चा वर्ल्ड कप’ : सौरव गांगुली
आरजे महवश (RJ Mahvash) आणि चहल यांचा संवाद एवढ्यावरच थांबला नाही. अभिनेता विवेक ओबेरॉयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, सामन्याच्या निकालाबद्दल विचारले असता चहलने आत्मविश्वासाने भारताच्या विजयाचा अंदाज व्यक्त केला होता.
मनोरंजक बाब म्हणजे, चहल इंस्टाग्रामवर आरजे महवशला (RJ Mahvash) फॉलो करतो, आणि दोघेही २०२२ च्या एका मुलाखतीत एकत्र दिसले होते. त्यामुळेच त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.