दुबई : टी-२० वर्ल्ड कप २०२४ जिंकल्यावर रोहित शर्माने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती, त्यानुसार रोहित चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर सुद्धा निवृत्तीची घोषणा करू शकतो अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मात्र रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांवर माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठे वक्तव्य केले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा फायनल सामना खेळवला जात होता. क्रिकेट विश्वात अशी चर्चा आहे की हा सामना भारताचा कर्णधार रोहित शर्माचा शेवटचा वनडे सामना ठरू शकतो. ज्याप्रकारे टी-२० वर्ल्ड कप २०२४ जिंकल्यावर रोहित शर्माने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती, त्यानुसार रोहित चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर सुद्धा निवृत्तीची घोषणा करू शकतो अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
Holi Special Kokan Bus : खासगी बसच्या किंमतीत वाढ झाल्याने चाकरमान्यांची होळी आधीच बोंबाबोंब
मात्र रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांवर माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठे वक्तव्य केले आहे. गांगुलीचे म्हणणे की, पुढील आयसीसी टूर्नामेंट येईपर्यंत रोहित निवृत्ती घेणार आणि आणि भारताकडून खेळेल. म्हणजेच गांगुलीचे म्हणणे आहे की रोहित शर्मा २०२७ वर्ल्ड कपमध्ये सुद्धा खेळू शकतो. गांगुली म्हणाला की, त्याने काही महिन्यांपूर्वीच वर्ल्ड कप जिंकला आहे. मला माहित नाही की सिलेक्टर्स काय विचार करतात, पण रोहित खूप चांगले खेळत आहे. भारताचा न्यूझीलंडपेक्षा खूप चांगला खेळ आहे. तसेच आता चॅम्पियन्स ट्रॉफीचे सुद्धा सर्व सामने जिंकत आला असल्याने, तेव्हा हीच टीम खेळणार आहे’. असे गांगुली म्हणाला.