दुबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने तडाखेबंद अर्धशतक ठोकले आहे. रोहितने ४१ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. य़ा खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ३ षटकार ठोकले.
रोहित शर्मासाठी हे अर्धशतक खूप खास आहे कारण आयसीसीच्या फायनलमध्ये त्याने ही कामगिरी पहिल्यांदा केली आहे. त्यामुळेच त्याची ही खेळी ऐतिहासिक आहे. याआधी त्याला कधीही आयसीसी स्पर्धेच्या फायनल सामन्यात अर्धशतकी खेळी करता आली ननव्हती. इतकंच नव्हे रोहितच्या ताबडतोब अर्धशतकामुळे फायनलमध्ये टीम इंडियाला दमदार सुरूवात मिळाली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतासमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान आहे. टॉस जिंकत न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २५१ धावा केल्या. फलंदाजीदरम्यान किवी संघाची सुरूवात चांगली राहिली. रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी ७.५ षटकांत ५७ धावांची भागीदारी केली.