कर्नाटकमध्ये चाललंय काय ? सिद्धरामय्यांच्या राज्यात दोन महिला पर्यटकांवर सामूहिक बलात्कार, पीडितांपैकी एक इस्रायलची नागरिक

हम्पी : कर्नाटकमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. हम्पी या कर्नाटकमधील लोकप्रिय पर्यटनस्थळी दोन महिला पर्यटकांवर सामूहिक बलात्कार झाला. पीडितांपैकी एक इस्रायलची नागरिक आहे.







हम्पी येथे तीन अज्ञात व्यक्तींनी दोन महिला पर्यटकांवर सामूहिक बलात्कार केला. याआधी महिलांसोबत असलेल्या तीन जणांना अज्ञातांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या तिघांना अज्ञातांनी तुंगभद्रा नदीच्या कालव्यात फेकून दिले. सामूहिक बलात्कार केल्यानंतर आलेले अज्ञात घटनास्थळावरुन पळून गेले. पीडितांनी धीर करुन जवळचे पोलीस ठाणे गाठले आणि अज्ञातांविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी पथक पाठवले. पीडितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.



पीडितांनी दिलेल्या माहितीआधारे कालव्यात फेकलेल्या तीन जणांचा पाण्यामध्ये शोध सुरू झाला. या मोहिमेदरम्यान महिलांसोबत असलेल्या ३ जणांपैकी एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना मिळाला आहे. इतर दोन पुरुषांचा शोध सुरू आहे. पीडितांनी दिलेल्या तक्रारीआधारे पोलिसांनी तीन आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण इस्रायलची नागरिक असलेली महिला पर्यटक, होम स्टे संचालिका आणि तीन पुरुष पर्यटक असे पाच जण हम्पी येथे पर्यटनाचा आनंद घेत होते. पुरुष पर्यटकांपैकी एक अमेरिकेचा नागरिक होता तर एक महाराष्ट्रातील रहिवासी आहे. ज्याचा मृतदेह मिळाला, तो ओडिशातील तरुण आहे. अज्ञात तीन जणांनी पुरुष पर्यटकांना बेदम मारहाण करुन कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकून दिले आणि महिलांवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणात गंगावती ग्रामीण पोलीस ठाणे तपास करत आहे.

पीडितांनी ज्या अज्ञातांची माहिती दिली ते एका दुचाकीवरुन आले होते. पेट्रोल पंपाची चौकशी करण्याच्या निमित्ताने थोडा वेळ बोलल्यानंतर संधी साधून त्यांनी पुरुष पर्यटकांना मारहाण सुरू केली. अज्ञातांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पण पैसे मिळाले नाही म्हणून पुरुषांना मारहाण करुन कालव्याच्या पाण्यात फेकले आणि महिलांवर सामूहिक बलात्कार केला.
Comments
Add Comment

बदरी-केदारसह चारधाममध्ये मोबाईल बंदी ,प्रशासनाची रील आणि फोटोवर कडक नजर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेची मर्यादा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी यावर्षी

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष

प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर 'गणेशोत्सवा'चा भव्य चित्ररथ नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) : राजधानी नवी दिल्ली

भाजप हीच देशाची पहिली पसंती: पंतप्रधान मोदी

सुशासनासाठी जनतेचा विक्रमी जनादेश! देशाला आता केवळ विकास आणि 'गुड गव्हर्नन्स' हवा दिसपुर (वृत्तसंस्था): आज भाजप

Papa Rao Killed in Encounter : नक्षलवाद्यांचा अजून ईक्का ठार..पोलीसांची मोठी कारवाई.

छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे व तेथील नागरिकांना ही दिलासा

भारतीय सेनेच्या ताफ्यात कामिकाझे ड्रोन

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सेना आपल्या लढाऊ क्षमतेत सातत्याने वाढ करत असून, त्याचाच भाग म्हणून सेनेने

प्रजासत्ताक दिनासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज

दहशतवादी हल्ल्याचे सावट नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देशभरातील सुरक्षा