मुंबई : आजचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विधान परिषदेत गाजले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी या अधिवेशनात महापुरुषांच्या अपमानाची रांगोळी काढली असल्याचे गेले काही दिवस पहावयास मिळत आहे. अबू आझमी यांच्यानंतर काल उबाठा चे आमदार अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांसोबत स्वतःची बरोबरी करत त्यांचा अपमान केला आणि या अपमानाचे पडसाद आज सकाळीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आणि त्यानंतर विधान परिषदेत पहावयास मिळाले. दरम्यान मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांचा आक्रमक आणि भेदक मारा विरोधकांवर प्रहार करणारा ठरला आणि उबाठा सहित सर्वच विरोधी आमदार गर्भगळीत (UBT Sena) झाले. अखेर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पक्षाचे नेते म्हणून मी जाहीररीत्या अनिल परब यांच्या वक्तव्याची माफी मागतो अशा पद्धतीचे शरणागती पत्करली.
मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) आपल्या नेहमीच्या स्टाईलने विरोधकांवर आक्रमक आणि भेदक मारा करतात. सगळ्यात विरोधकांना बिनधास्तपणे ते अंगावर घेतात. अशा वेळी पक्षातील भारतीय जनता पार्टी, शिंदे शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदारांची साथ त्यांना मिळतेच. आज अशाच सत्ताधाऱ्यांची साथ घेऊन विरोधकांची चांगलीच गोची केली. प्रकरण अंगाशी आले आहे असे लक्षात येताच विरोधक विधान परिषदेत पुरता घायाळ झाला. कोणताच बचाव करता आला नाही. हीच परिस्थिती राहिल्यास अनिल परब यांना निलंबना पर्यंतची कारवाई ला सामोरे जावे लागणार आणि सत्ताधारी तेवढेच आक्रमक असल्यामुळे अंबादास दानवे यांनी परिषदेतील तापलेल्या वातावरणाचा पारा आणखीन वाढवण्यापेक्षा माफी मागून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. एकूणच परिस्थितीचा विचार करता आजची विधान परिषद नितेश राणे यांनी आपल्या आक्रमक शैलीतून विरोधकांना शालजोडीतले देतानाच अनिल परब यांचा पान उतारा करत त्यांना छत्रपती संभाजी महाराजांची आणि शिवप्रेमींची माफी मागण्यास भाग पाडले. अनिल परब यांनी अखेर संभाजी महाराजांची माफी मागितली आणि या विषयावर पडदा पडला.
नितेश राणे आणि अनिल परब यांच्यात शाब्दिक चकमक, कामकाज तहकूब
दरम्यान अनिल परब यांना फैलावर घेताना मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आघाडी सरकारमध्ये अनिल परब मंत्री असताना केलेल्या हिशेब चुकता केला. जसे करावे तसे भरावे नियती लांब नाही. नियतीनेच तुम्हाला तुमची जागा दाखवून दिलेले आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवणावरून उठवण्या पासून, अटकेपर्यंत ठाकरे सरकारची जी मजल गेलेली होती. त्या सर्व गोष्टींचा हिशेब विधान परिषदेतील या चर्चदरम्यान मंत्री नितेश राणे यांनी चुकता केली आणि आक्रमकते बरोबरच विरोधकांना घायाळ करता येते. विरोधकांची बोलती बंद करता येते हे आज परिषदेतील सभागृहात मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दाखवून दिले.