मुंबई : शिक्षक व पदवीधर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन (Teachers Protest) केले. या आंदोलनात आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार ज मो अभ्यंकर, आमदार जयंत आसगावकर, आमदार विक्रम काळे, आमदार किशोर दराडे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, सहभागी झाले होते.
जोपर्यंत शासन शिक्षकांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आमचा लढा (Teachers Protest) सुरूच राहणार असल्याचे यावेळी आमदार म्हात्रे यांनी सांगितले.
अशा आहेत मागण्या…
१. राज्यातील दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन आदेश निर्गमित केलेल्या शाळांना पुढील टप्पा साठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद मिळावी.
२. दिनांक १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
३. संच मान्यतेचा जाचक शासन आदेश रद्द करावा.
४. समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा.