CAPF Recruitment Exam : मातृभाषेत होणार ‘सीएपीएफ’ची भरती परीक्षा- अमित शहा

नवी दिल्ली : केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची (सीएपीएफ) भरती परीक्षा आता मातृभाषेत देता येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. रानीपेट येथील अरक्कोनम येथे आज, शुक्रवारी आयोजित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) ५६ व्या स्थापना दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी सीआयएसएफ परेडचा आढावाही घेतल्यानंतर गृहमंत्र्यांनी सीआयएसएफच्या १२७ हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आणि २२ सैनिकांना सन्मानित केले. यापैकी १० सैनिकांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि १० सैनिकांना शौर्य पदक प्रदान करण्यात आले. याशिवाय, सीआयएसएफ कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी ८८ कोटी रुपये खर्चाच्या ६ नवीन प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.


याप्रसंगी गृहमंत्र्यांनी सांगितले की, आतापर्यंत सीएपीएफ भरतीमध्ये मातृभाषेला स्थान नव्हते, परंतु पंतप्रधान मोदींनी निर्णय घेतला की आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व भाषांमध्ये परीक्षा देण्याची सुविधा असेल, ज्यामध्ये तामिळचाही समावेश असेल. त्यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना राज्यात तमिळ भाषेत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली. यामुळे केवळ मातृभाषेला प्रोत्साहन मिळणार नाही तर तमिळ भाषेत परीक्षा देणाऱ्या तरुणांना समान संधी देखील मिळेल. गेल्या ५६ वर्षात सीआयएसएफने देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.



सीआयएसएफशिवाय भारतातील उद्योग, व्यापार, पर्यटन आणि संशोधन केंद्रांच्या सुरक्षेची कल्पनाही करता येणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी २०२७ पर्यंत भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत 'विकसित भारत' बनवण्याचा संकल्प केला आहे, असेही त्यांनी सांगितले. हे ध्येय साध्य करण्यासाठी सीआयएसएफची भूमिका महत्त्वाची असेल.


सीआयएसएफ दररोज देशभरातील १ कोटींहून अधिक लोकांची सुरक्षित हालचाल सुनिश्चित करते. सीआयएसएफने विमानतळांची सुरक्षा हाती घेतल्यापासून सुरक्षेत कोणतीही मोठी चूक झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. नवीन संसद भवन, दिल्ली मेट्रो, समुद्री बंदरे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफची आहे. गृहमंत्र्यांनी सांगितले की, दरवर्षी सीएपीएफद्वारे १ लाखाहून अधिक तरुणांची भरती केली जात आहे. यापूर्वी २०२४ मध्ये १४ हजार पदांसाठी भरती करण्यात आली असून ५० हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या निर्णयामुळे देशभरातील तरुणांना त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देऊन सीएपीएफमध्ये दाखल होण्याची उत्तम संधी मिळेल.

Comments
Add Comment

कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार : चार महिन्यांत तिसरी घटना, मुंबईतही हल्ल्याची धमकी!

कॅनडा : प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार झाला असून, गेल्या चार महिन्यांत

मुंबई-ठाण्यात पावसामुळे नागरिकांची तारांबळ; दिवाळीच्या खरेदीला मोठा फटका!

हवामान खात्याचा 'यलो अलर्ट' खरा ठरला; पुढील ६ ते ७ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई/ठाणे: पाऊस परत आला! हवामान

छत्तीसगडमध्ये १७० माओवादी आत्मसमर्पित!

छत्तीसगड : छत्तीसगड राज्यात नक्षलविरोधी लढ्यात मोठे यश मिळाले असून, तब्बल १७० माओवादी कार्यकर्त्यांनी

राम मंदिर स्टेशनवर 'रिअल लाईफ रणछोड'ने प्रसूती केली!

राम मंदिर स्टेशनवर लोकलमध्येच महिलेची प्रसूती; तरुणाने दाखवले धाडस व्हिडिओ कॉलवर डॉक्टरच्या मदतीने केली मदत;

अपहरण प्रकरणात खेडेकर कुटुंबाला हायकोर्टाचा अटकपूर्व जामीन मंजूर

पीडित व्यक्तीला ४ लाख भरपाई आणि पोलीस कल्याण निधीत १ लाख जमा करण्याचे कठोर निर्देश मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने

८१ कोटी लोकांसाठी अन्नसुरक्षा: भारत सरकारकडून जागतिक अन्न दिनानिमित्त खास योजना

नवी दिल्ली : जागतिक अन्न दिनानिमित्त भारत सरकारने देशातील ८१ कोटी नागरिकांना अन्न आणि पोषण सुरक्षा देण्याचा