हाऊसिंग डॉटकॉमचा ऑनलाईन प्रॉपर्टी फेस्ट

मुंबई : रिअल इस्टेट अॅप हाऊसिंग डॉटकॉमने ऑनलाईन प्रॉपर्टी फेस्ट 'हॅपी न्यू होम्स २०२५' अर्थात 'HNH25' ची घोषणा केली आहे. हे या फेस्टिव्हलचे आठवे वर्ष आहे. यंदाचा 'हॅपी न्यू होम्स २०२५' फेस्ट सोमवार १० मार्च २०२५ पासून आणि गुरुवार १० एप्रिल २०२५ पर्यंत चालणार आहे. महिनाभर चालणारा हा व्हर्च्युअल प्रॉपर्टी फेस्ट आजवरचा सर्वात मोठा फेस्ट असणार आहे. यंदा या फेस्टची देशातील ३४ शहरांपर्यंत पोहोच (Reach) असेल. प्रसिद्ध आणि अनुभवी विकासक, आकर्षक सौदे आणि घर खरेदीचा उत्तम अनुभव हे या फेस्टचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. घर शोधणाऱ्यांसाठीचा 'वन स्टॉप प्लॅटफॉर्म' म्हणजे 'हॅपी न्यू होम्स २०२५' असेल; असा विश्वास हाऊसिंग डॉटकॉमचे चीफ रेव्हेन्यू ऑफिसर अमित मसलदान यांनी व्यक्त केला.



हाऊसिंग डॉटकॉम 'हॅपी न्यू होम्स २०२५' फेस्टद्वारे घर खरेदी करणाऱ्या आधुनिक ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि पसंती पूर्ण करणारी नावीन्यपूर्ण सोल्यूशन्स प्रदान करत आहे. आमची वचनबद्धता केवळ मालमत्ता दाखवण्यापुरती नसून आम्ही एक व्यापक ईकोसिस्टम तयार करत आहोत, जेथे पारदर्शकता आणि टेक्नॉलॉजी यांचा संयोग असेल आणि ही ईकोसिस्टम प्रत्येक घर खरेदी करू इच्छिणाऱ्यास माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करेल; असेही हाऊसिंग डॉटकॉमचे चीफ रेव्हेन्यू ऑफिसर अमित मसलदान म्हणाले.



यंदाचा 'हॅपी न्यू होम्स २०२५' फेस्ट अनेक अत्याधुनिक इनोव्हेशन्स घेऊन येत आहे, ज्यांच्यामुळे घर खरेदी करण्याचा अनुभव अधिक चांगला होईल. यंदाच्या इव्हेंटमधील एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे प्रोजेक्टचे व्हिडीओ. या व्हिडिओंद्वारे अँकर प्रत्येक प्रोजेक्टची सविस्तर माहिती अगदी सोप्या शब्दात सांगतील. यामुळे ग्राहकांना निर्णय घेण्यास मदत होईल. प्रत्येक व्हिडीओ बघताना संबंधित प्रॉपर्टी प्रत्यक्ष जाऊन वेगवेगळ्या दिशेने स्वतः बघितल्याचा अनुभव मिळेल. तसेच हाऊसिंग डॉटकॉम मार्फत गृह कर्ज घेणाऱ्या उपभोक्त्यांना खात्रीने कॅशबॅक मिळेल. ज्यामुळे त्यांच्या घर खरेदीच्या प्रवासात मूल्यवर्धन होईल. 'हॅपी न्यू होम्स २०२५' फेस्ट घर शोधणाऱ्या लोकांना ४४०० पेक्षा जास्त डेव्हलपर्स आणि चॅनल भागीदारांशी जोडेल. महानगरे, टिअर २ आणि टिअर ३ शहरांतील निवासी मालमत्तांचे व्यापक पर्याय उपलब्ध होतील.
Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी