बोगस औषध खरेदी प्रकरणी दोषींवर कारवाई करणार

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती


मुंबई (प्रतिनिधी) : बोगस औषध खरेदी करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्यांची शासन कोणत्याही प्रकारे गय करणार नाही. बोगस औषधी खरेदीसंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली. सदस्य सुनील प्रभू यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली केली होती.


या चर्चेत सदस्य नाना पटोले, अतुल भातखळकर, सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला. अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ म्हणाले, या प्रकरणी केलेल्या तपासामध्ये मे. मिनिस्टल कॉम्बिनेशन ही उत्तराखंडची औषधे कंपनी अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले. या उत्पादकांनी उत्पादित केलेल्या औषधांचा साठा विश्लेषणार्थ घेऊन चाचणी करण्यात आली.


चाचणीअंती या कंपनीकडून उत्पादित औषधे बनावट असल्याचे आढळून आले. या बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या पेढ्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. या पेढ्यांचे परवाने ३० सप्टेंबर २०२४ पासून रद्द करण्यात आले आहेत. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही या चर्चेच्या उत्तरात सहभाग घेताना सांगितले.

Comments
Add Comment

उबाठा सोडून शिवसेना,भाजपात गेलेल्या कुणी मिळवली विजयश्री

उबाठात राहूनही ९ जणांची उमेदवारी नाकारली, ९ जणांचा पराभव मुंबई (सचिन धानजी) : शिवसेनेत जुलै २०२२ रोजी मोठा राजकीय

सीईटी नोंदणीत ‘आधार’चा अडथळा

नावातील विसंगतीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

मुंबई : भारतीय चित्रपटसंगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ संगीतकार आणि पद्मविभूषण सन्मानित इलयाराजा यांना यंदाचा

अंधेरीत सोसायटीवर गोळीबार, आरोपी फरार; गुन्हा दाखल, तपास सुरू

मुंबई : अंधेरीत लोखंडवाला बॅक रोड परिसरात एका सोसायटीच्या दिशेने अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामुळे

मुंबई महापालिकेत यंदाही महापौरांविना झेंडावंदन

महापौरांची निवड काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूक संपन्न होवून मतदारांनी

प्रजासत्ताक दिनी मेट्रो २ बी आणि मेट्रो ९ सेवेत येणार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर रखडलेले मेट्रो प्रकल्प पुन्हा मार्गी लागले असून, मंडाळे ते