मुंबईत अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी केले अत्याचार

मुंबई : पुण्याच्या स्वारगेट एसटी डेपोतील रिकाम्या आणि दिवे बंद असलेल्या बसमध्ये अत्याचार करण्यात आल्याची तक्रार तरुणीने पोलिसांकडे नोंदवली. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच मुंबईतील जोगेश्वरीत एसी मेकॅनिक असलेल्या पाच नराधमांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना पकडले असून त्यांच्या विरोधात पॉक्सोअंतर्गत (POCSO Act or Protection of Children from Sexual Offences Act) गुन्हा नोंदवला आहे.



सामूहिक लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपींनी अल्पवयीन मुलीला जोगेश्वरी येथून जबरदस्तीने दादरला आणून सोडले. मुलीची अवस्था बघून दादरमध्ये पोलिसांनी तिची चौकशी केली. पोलिसांना बघितल्यावर मुलीने धाडस करुन माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करुन नराधमांना पकडले. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. मुलीची आणि पकडलेल्या पाच जणांची आधीपासून ओळख होती का ? ही बाब पण तपासली जात आहे. पण राज्यात लागोपाठ घडत असलेल्या या घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधक या मुद्यावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध