Monday, March 24, 2025
Homeदेशअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अॅसिड फेकून ॐ टॅटू नष्ट केला आणि जबरदस्तीने...

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अॅसिड फेकून ॐ टॅटू नष्ट केला आणि जबरदस्तीने गोमांस खाऊ घातले

मुरादाबाद : कपडे शिवायला घेऊन जात असलेल्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी बलात्कार केला. पाशवी बलात्कार केल्यानंतर नराधमांनी ॐ टॅटू नष्ट करण्यासाठी मुलीवर अॅसिड फेकले. हे कमी म्हणून मुलीला जबरदस्तीने गोमांस खाऊ घातले. या प्रकरणात चौघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्याचे नाव सलमान असे आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबादच्या भगतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात घडली.

मुंबईत अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी केले अत्याचार

मुलगी कपडे शिवायला घेऊन जात होती, त्यावेळी चौघांनी तिचे अपहरण केले. मुलीला जबरदस्तीने एका घरात नेण्यात आले. यानंतर घराचे दार बंद करुन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

अपहरण केल्यानंतर मुलीला जबरदस्तीने अज्ञात पदार्थ खाऊ घालण्यात आला. यानंतर तिच्यावर चौघांनी पाशवी बलात्कार केला. थोड्या वेळाने मुलीच्या अंगावर अॅसिड फेकून तिच्या शरीरावरील ॐ टॅटू नष्ट करण्यात आला. मुलीला जबरदस्तीने गोमांस खाऊ घालण्यात आले. मुलीला बरेच दिवस घरात कोंडले होते. ती घरातून बाहेर पडून नंतर कशीबशी स्वतःच्या घरी पोहोचली. घरातून कपडे शिवायला निघाली होती त्याला दोन महिने उलटल्यावर मुलगी पुन्हा स्वतःच्या घरी पोहोचली होती. मुलीची अवस्था बघून कुटुंबियांनी चौकशी केली आणि सगळा प्रकार समजल्यावर पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणात पोलिसांनी सलमान, झुबेर, राशिद आणि आरिफ या चौघांविरोधात दुष्कर्म करणे, पॉक्सो कायदा (Protection of Children from Sexual Offences Act or POCSO ACT), एससीएसटी कायदा याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात सलमानला अटक केली आहे. इतर तीन जणांचा शोध सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -