माणिकराव कोकाटेंना न्यायालयातून दिलासा

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने कोकाटेंला दिलेली शिक्षा स्थगित केली आहे. यामुळे कोकाटेंच्या मंत्रि‍पदावरील टांगती तलवार दूर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीची सदनिका मिळवताना शासनाची फसवणूक करणारी माहिती सादर केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झाली होती. यामुळे कोकाटेंना मंत्रिपदावरुन हटवावे अशी मागणी विरोधक करत होते. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाल्यास मंत्रिपद तसेच आमदारकी रद्द करता येते. हे संकट टाळण्यासाठी कोकाटेंनी न्यायालयात दाद मागितली होती. अखेर माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दिलासा दिला.



याआधी सोमवार ३ मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक दररोज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. पण विषय कोर्टात आहे आणि निकाल आल्यावर पुढचा निर्णय घेता येईल, अशी भूमिका शासनाने घेतली होती. अखेर आज (बुधवार ५ मार्च २०२५) न्यायालयाचा निर्णय आला आहे. न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे कोकाटेंच्या मंत्रि‍पदावरील टांगती तलवार दूर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Comments
Add Comment

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल