पोकोचा गेमिंग, रील्स, सोशल मीडिया, सेल्फी, फोटोसाठी उपयुक्त ५जी स्मार्टफोन ९९९९ रुपयांत

मुंबई : पोकोने गेमिंग, रील्स, सोशल मीडिया, सेल्फी, फोटोसाठी उपयुक्त ५जी स्मार्टफोन ९९९९ रुपयांत उपलब्ध करुन दिला आहे. पोको एम७ ५जी त्‍याच्‍या सेगमेंटमधील सर्वात मोठा ६.८८ इंच डिस्‍प्‍ले, तसेच अल्‍ट्रा-स्‍मूद १२० हर्ट्झ अॅडप्टिव्‍ह रिफ्रेश रेट असलेला एकमेव स्‍मार्टफोन आहे. मनसोक्‍त मनोरंजनाचा, गेमिंगचा किंवा ब्राउजिंगचा आनंद घ्‍यायचा असो पोको एम७ ५जी सर्वोत्तम, डोळ्यांसाठी अनुकूल वापराचा अनुभव देतो. स्‍नॅपड्रॅगन® ४ जेन २ चिपसेटची शक्‍ती, १२ जीबी रॅम (६ जीबी टर्बो रॅम) आणि ५१६० एमएएच बॅटरी असलेला हा स्‍मार्टफोन दीर्घकाळापर्यंत डिवाईसचा वापर करणाऱ्या वापरकर्त्‍यांसाठी सुलभ, विनाव्‍यत्‍यय कार्यक्षमता देतो.तसेच ५० मेगापिक्‍सल सोनी सेन्‍सर अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्ट व आकर्षक फोटो क्षमता उपलब्ध करुन देतो. सोप्या शब्दात सांगायचे तर पोको एम७ ५जी वाजवी दरात उल्लेखनीय अशी कार्यक्षमता, आकर्षक डिस्‍प्‍ले आणि पॉवर-पॅक कॅमेरा देतो, असे पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशू टंडन म्‍हणाले.



पोको एम७ ५जीची प्रमुख वैशिष्ट्ये :

  1. स्‍नॅपड्रॅगन ४ जेन २ + १२ जीबी रॅम - भारतातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह गेमिंग, एडिटिंगचा आनंद घ्‍या आणि दैनंदिन टास्‍क्‍स करा.

  2. सेगमेंटमधील सर्वात मोठा ६.८८ इंच डिस्प्‍ले - टीयूव्‍ही ऱ्हेनलँड ट्रिपल आय प्रोटेक्‍शनसह श्रेणीमधील सर्वात मोठ्या डिस्‍प्‍लेसह चित्रपट, रील्‍स आणि गेम्‍सचा अभूतपूर्व आनंद घ्‍या.

  3. ५० मेगापिक्‍सल सोनी सेन्‍सर - अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍ट व आकर्षक फोटो कॅप्‍चर करतो.

  4. ५१६० एमएएच बॅटरी + १८ वॅट फास्‍ट चार्जिंग (३३ वॅट इन-बॉक्‍स चार्जर) - दिवसभर बॅटरी कार्यरत राहते, तसेच काही मिनिटांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते.

  5. नेक्‍स्‍ट जनरेशनसाठी डिझाइन करण्‍यात आलेला डिवाईस - अत्‍यंत किफायतशीर किमतीत जलद, फ्यूचर-रेडी ५जी कनेक्‍टीव्हिटी.


पोको एम७ ५जी अद्वितीय दरामध्‍ये लाँच करण्‍यात आला आहे. फक्‍त ९,९९९ रूपयांमध्‍ये ६ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍ट, १०,९९९ रूपयांमध्‍ये ८ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍ट खरेदी करा - पहिल्‍या दिवसाच्‍या विक्रीसाठी स्‍पेशल किंमत. फक्‍त पहिल्‍या दिवशी वरील स्‍पेशल किमतींचा लाभ घ्‍या, पोको एम७ ५जी ची विक्री ७ मार्च दुपारी १२ वाजल्‍यापासून फक्‍त फ्लिपकार्टवर सुरू होत आहे.
Comments
Add Comment

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल