मुंबई: जर तुम्ही वारंवार रिचार्जमुळे त्रस्त असाल तर आम्ही तुमच्यासाठी शानदार प्लानची माहिती घेऊन आलो आहोत. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने एक दीर्घकाळाच्या व्हॅलिडिटीचा प्लान आणला आहे. जर तुम्ही हा रिचार्ज केलात तर पुढील वर्षी होळीनंतरही तुम्हाला रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. या रिचार्ज प्लानमध्ये कॉलिंगसह अनेक फायदेही मिळत आहे.
BSNL २३९९ रूपयांच्या या प्लानमध्ये आपल्या ग्राहकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करणार आहे. यात वर्षभरापेक्षा अधिक व्हॅलिडिटी तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा ऑफर केला जात आहे. हा प्लान आज रिचार्ज केलात तर तुम्हाला पुढील वर्षी मे पर्यंत डेटा, एसएमएस, कॉलिंग आणि व्हॅलिडिटीची चिंता करण्याची गरज नाही. या एकाच प्लानमध्ये कंपनी तुम्हाला छप्परफाड फायदे देत आहे.
या प्लानमध्ये ४२५ दिवसांची म्हणजेच १४ महिन्यांची व्हॅलिडिटी मिळते. या १४ महिन्यांदरम्यान कंपनी देशभरात कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देत आहे. यासोबतच १४ महिन्यांपर्यंत युजर्स ला दररोज १०० एसएमएस वापरण्याची सुविधा मिळेल. डेटाचेही टेन्शन घेण्याचे गरज नाही. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा ऑफर केला जातो. डेटा लिमिट संपल्यानंतर कमी स्पीडवरही नेटचा वापर करता येतो.
मुंबई : दोन दिवसांपूर्वी वसईतील (Vasai Crime) एका सात वर्षीय चिमुकल्या मुलीच्या मृत्यूची घटना घडली…
कल्याण : वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने (KDMC) कल्याणमधील सहजानंद चौकात सौरऊर्जेवर चालणारा…
मुंबई : सध्या बाहेर कुठेही बाहेर पडायचं झालं तरी चेहरा, अंग झाकेल असे कपडे घालूनच…
मुंबई : कधी मराठी - अमराठी तर कधी भूमिपुत्रांचे हक्क तर कधी उद्धव - राज…
जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…