बेकऱ्यांना इंधनासाठी महानगर गॅसने केली अनामत रक्कम माफ

  47

बेकरी शिष्टमंडळासह एमजीएलसोबत डॉ गगराणी यांनी घेतली बैठक


मुंबई : बेकऱ्या आणि त्यातील हॉटेलमधील तंदूरसाठी वापरण्यात येणार भट्टयांमध्ये कोळसा वापरण्यास बंदी आणल्यामुळे मुंबईतील बेकरी व्यवसायिकांमध्ये भीती निर्माण झाल्याने यासर्व बेकरी व्यवसायिकांच्या असोशिएशनची बृहन्मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांच्यासमवेत बैठक पार पडली.


या बैठकीत महानगर गॅस जोडणीसाठी आवश्यक असलेली अनामत रक्कम माफ केली जाणार असून तशी ग्वाही महानगर गॅसने दिली आहे. तसेच इंधन बदलल्यामुळे परवान्याचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता राहणार नाही. "परवान्यांचे नूतनीकरण प्राधान्याने केले जाईल. अन्न प्रक्रिया उपक्रमांच्या पंतप्रधान औपचारिकीकरण योजनेअंतर्गत व्यवसायाला ३० टक्के अनुदानही मिळेल,असे या बैठकीत नमुद करण्यात आले आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिकेने हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बेकरींना लाकूड आणि कोळशाच्या वापरावर बंदी घालणाऱ्या नोटिसा बजावल्यामुळे यासर्व पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी महानगर पालिका, महानगर गॅस यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आणि बेकरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्तांसमवेत बैठक घेण्यात आली. बेकरी असोसिएशनच्या समस्यांवर औपचारिक सुनावणी घेण्याचे आवाहन शेख यांनी महापालिका आयुक्त डॉ गगराणी यांना पत्र लिहिले होते, त्यानुसार ही बैठक घेवून त्यामध्ये काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.


"पायाभूत सुविधांच्या कमतरतेबद्दल महानगर गॅसने सांगितले की. ते संपूर्ण शहराचे मॅपिंग करेल. जेणेकरून सध्याच्या पायाभूत सुविधा असलेल्या आणि पायाभूत सुविधांची कमतरता असलेल्या क्षेत्रांचे चिन्हांकन केले जाईल," अशी माहिती आमदार रईस शेख यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. तसेच, ते पुढे म्हणाले की इंधन बदलल्यामुळे परवान्याचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता राहणार नाही. "परवान्यांचे नूतनीकरण प्राधान्याने केले जाईल. अन्न प्रक्रिया उपक्रमांच्या पंतप्रधान औपचारिकीकरण योजनेअंतर्गत व्यवसायाला ३० टक्के अनुदानही मिळेल.


महाराष्ट प्रदुषण नियामक मंडळ अर्थात एमपीसीबीही ते जुळवून घेईल. त्याच्या व्यवसायांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन या बैठकीत संबंधितांनी दिल्याचे शेख यांनी म्हटले आहे. महानगर गॅसने या जोडणीसाठी आवश्यक असलेली अनामत रक्कम अर्थात डिपॉझिट रक्कमही माफ केली आहे. "तसेच, महानगर गॅस लिमिटेड ही कंपनी बेकरींना डिझाइन आणि नियोजनात मदत करेल आणि भट्टीपर्यंत वाहिनी टाकून देईल. त्यामुळे या बेकरी व्यावसायिकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे,असेही, शेख यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis on Mumbai Kabutar Khana : "कबुतरखाने अचानक बंद करू नका", कबुतरांना खुराक देण्याची जबाबदारी बीएमसीचीच...फडणवीसांची सूचना

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कठोर कारवाई सुरू केली होती.

Dattatray Bharane : दत्तात्रय भरणे कृषीमंत्री पदावर; "राज्यात विविध भागांमध्ये फिरा, मी पाठीशी"...फडणवीसांच आश्वासन

‘शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार, निर्णय घेणार’ : मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई : विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना

कोल्हापूरकरांनो तयार राहा! महादेवी हत्तीणींसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, आनंदवार्ता कुठल्याही क्षणी!

मुंबई : कोल्हापूरच्या जनतेसाठी एक दिलासादायक घडामोड समोर येत आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Kabutar Khana : "१००% टॅक्स लावा, आम्ही तयार!", कबुतरखान्यासाठी गुजराती-जैन समाज आक्रमक!

मुंबई : मुंबईत विविध ठिकाणी असलेले कबूतरखाने बंद करण्याच्या मुद्यावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे.

Khalid Ka Shivaji : शिवरायांचा वापर करून फूट पाडण्याचा डाव? 'खालिद का शिवाजी' विरोधात हिंदुत्ववाद्यांचा प्रचंड रोष

मुंबई : 'शिवराय' म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. शिवरायांच्या नावाचा वापर करून समाजात फूट पाडण्याचा डाव रचला

Devendra Fadanvis : फडणवीसांचा निशिकांत दुबेनां थेट सल्ला, “आम्ही सक्षम आहोत, वक्तव्यांपूर्वी विचार करा!”

मुंबई : मराठी विरुद्ध हिंदी या वादावर पुन्हा एकदा पेटलेलं राजकारण आता चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे