Navneet Rana : औरंगजेबाची कबर उखडून फेका..

अबू आझमींच्या वक्तव्यावर संतापलेल्या नवनीत राणा यांची मागणी


अमरावती : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता, असे विधान केल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया देत एक व्हिडिओ शेअर केला आहे.


या व्हिडिओमध्ये नवनीत राणा यांनी अबू आझमींना छावा चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या की, इतिहास आणि चित्रपटातून स्पष्ट होते की, औरंगजेब हा क्रूर शासक होता. छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार करणारा आणि त्यांच्या डोळ्यांत सळई टाकणारा तो औरंगजेबच होता. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने औरंगजेबचे समर्थन करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.



नवनीत राणा यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबतही तीव्र भूमिका घेत, ती खुलताबादमधून उखडून फेकावी, अशी विनंती सरकारला केली आहे. हिंदू हिताचे समर्थन न करणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, असे मत व्यक्त करत, महायुतीचे सरकार औरंगजेबाची कबर उखडून फेकणार तर आहेच, पण ज्‍यांना औरंगजेबावर प्रेम आहे, त्‍यांनी आपल्‍या घरी ती कबर न्‍यावी, अशा शब्‍दात नवनीत राणा यांनी संताप व्‍यक्‍त केला आहे. महायुती सरकार याबाबत लवकरच कठोर निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग