IPL 2025 : अजिंक्य रहाणे ठरला कोलकाता संघाचा नवा कॅप्टन

मुंबई : आगामी २३ मार्चपासून आयपीएलच्या नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे.याआधीच सर्व संघांनी आपल्या संघाचे कर्णधार जाहीर केले आहे. आता कोलकाता संघाने आपला कर्णधार जाहीर केला आहे. मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे याच्याकडे कोलकाता संघाने कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यंदाच्या हंगामात अजिंक्य रहाणे कोलकाता संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल.


गत हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता संघाने विजेतेपद मिळवले होते. परंतु यंदाच्या साली झालेल्या लिलावात कोलकात्याने श्रेयस अय्यरला संघातून मुक्त केले. त्याच्याजागी कोलकाता संघाने रहाणेला मूळ किंमतीवर खरेदी करून त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाकडून तो खेळत होता. यावेळी चेन्नईने त्याला संघात कायम ठेवले नव्हते. अशावेळी आयपीएल २०२५ च्या लिलावात, कोलकाता संघाने रहाणेला केवळ मूळ किंमतीवर (बेस प्राईज) खरेदी केले. त्याची मूळ किंमत १.५० कोटी रुपये होती.



३६ वर्षीय अजिंक्य रहाणेने आतापर्यंत आयपीएलमध्ये १८५ सामने खेळले आहेत. त्याने ३०.१४ च्या सरासरीने ४६४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १२३.४२ होता. आयपीएलमध्ये त्याने २ शतके आणि ३० अर्धशतके केली आहेत.आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघ कशा प्रकारे आपली कामगिरी करतो हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Cristiano & Georgina : फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जॉर्जियाना रॉड्रिगेझ अडकणार लग्नबेडीत; मादेरा येथे रंगणार सोहळा

फुटबॉल जगतातील लोकप्रिय तारा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची पार्टनर, मॉडेल जॉर्जियाना रॉड्रिगेझ यांच्या

IND vs SLA Test Series Sai Sudharsan : साई सुदर्शन सराव सामन्याला मुकणार, पण...; पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला दिलासा

India vs Sri Lanka Test Series : भारताच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी युवा फलंदाज साई सुदर्शन (Sai Sudharsan) याच्या दुखापतीमुळे चाहत्यांची

Rohit Sharma Selection Controversy : रोहित शर्माच्या निवडीवरून BCCI विरुद्ध निवड समिती? आगरकर कोंडीत; पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे?

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वरिष्ठ खेळाडूंच्या निवडीवरून चर्चांना उधाण आले आहे. रोहित शर्माच्या (Rohit

ICC ODI World Cup : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : पुरुषांच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. स्पर्धा सुरू

Sunil Gavaskar on Ajinkya Rahane : 'अजिंक्य रहाणेला कधीच योग्य श्रेय मिळालं नाही'; रहाणेच्या निवृत्तीनंतर सुनील गावसकर भावुक, राहुल द्रविडशी केली तुलना

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय

Brock Lesnar : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. समरस्लॅमच्या मुख्य