सिव्हिल रुग्णालयातील प्रसूतिगृहात तीळ बाळं जन्मली!

  102

प्रसूतीवेळी जोखमीच्या सिझरिंगनंतर आई सुखरूप


ठाणे : बाळंतपणासाठी खासगी प्रसूतिगृहात खर्च झाला तरी चालेल; परंतु सरकारी रुग्णालयातील प्रसूतिगृहात बाळंतपण नको ही भूमिका अनेकांची असते... मात्र याला सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरत आहे.


रुग्णालयातील अद्ययावत प्रसूतिगृहात अत्यंत जोखमीच्या प्रसूती पार पडत असून, नुकतेच एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला आहे. आई आणि तिन्ही बाळ सुखरूप असून मंगळवारी त्यांना घरी पाठवण्यात आले.


ठाणे जिल्ह्यात बाळंतपणासाठी सिव्हील रुग्णालयातील प्रसुतिगृह आई आणि बाळासाठी वरदान ठरत आहे. रुग्णालयातील प्रसूतिगृह अद्ययावत असून, प्रसूतिसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उपचारासाठी येत आहेत. प्रसूतिगृहात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसुतिगृहात एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला असल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे यांनी दिली.


मुंब्र्यात रहाणाऱ्या एका २० वर्षीय महिलेला १८ फेब्रुवारी रोजी प्रसूतिगृहात सिझरींगनंतर तीन बाळांना जन्म दिला आहे. यामध्ये दोन मुल एक मुलगी आहे. बाळांची प्रकृती उत्तम असून वजन अनुक्रमे पहिले एक किलो ६०० ग्रॅम, दुसरे एक किलो ८०० तर एक किलो ५०० ग्रॅम आहे. त्यांच्या आईची प्रकृती ठणठणीत आहे. रुग्णालयात केलेल्या योग्य उपचारानंतर आई आणि बाळांना मंगळवारी घरी पाठवण्यात आले.


प्रसूतिच्या वेळी बालरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रेया शेळके, भुलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, डॉ.रूपाली यादव, डॉ. प्रकाश बोरुळकर, डॉ. शैलेश गोपनपल्लीकर, डॉ. राहुल गुरव, डॉ. सिद्धार्थ शहा, एसएनसीयू परिचारिका सारिका शेणेकर, शीतल जठार आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


सोनोग्राफी रिपोर्टनुसार समजले की, या महिलेच्या पोटात तीन बाळ आहेत. हे समजताच खूप आनंद झाला होता. यानंतर महिलेने दिलेल्या सर्व सूचना व पथ्य पाळून वेळोवेळी तपासणी केली. तीन बाळ एकत्रित सांभाळताना मोठी जबाबदारी आमच्यावर असते. मात्र अस असले तरी, एसएनसीयूमधील आमचे बालरोग तज्ज्ञ, वैद्यकिय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ आई आणि बाळाची आपुलकीने काळजी घेत असतात. - डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे,)


Comments
Add Comment

बांबूच्या चटईतून बाप्पाची शाश्वत आरास

देसले कुटुंबाचा संस्कृतीस्नेही उपक्रम ठाणे : गणेशोत्सव हा फक्त भक्तिभावाचा नव्हे तर संस्कृती, परंपरा आणि

Thane Varsha Marathon Winner: ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनचे विजेते जाहीर! पुरुष गटात धर्मेंद्र आणि महिला गटात रविना गायकवाड ठरले विजेते

ठाणे,: 'मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची' या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या एकतिसाव्या ठाणे महानगरपालिका

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतूक कोंडीने घेतला जीव! रुग्णवाहिकेतच महिलेचा तडफडून मृत्यू

पालघर: गेल्या काही दिवसांपासून मुंबई-अहमदाबाद मार्गावर कमालीची वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून यात आहे. मात्र

मोरबे धरणाच्या पातळीत घट

नवी मुंबईकरांची वाढली पाण्याची चिंता वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या मोरबे धरणाच्या पातळीत

सणासुदीला ठाण्यात वाहतूक कोंडीचा महाकाय विळखा!

ठाणे : रक्षाबंधन सणादरम्यान शनिवारी हजारो प्रवाशांना प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. प्रचंड वाहतूक

दिवाळीत पॉड टॅक्सीचे भूमिपूजन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाययोजना