Akola ST Bus : अकोल्यात धावती एसटी बस आगीच्या भक्ष्यस्थानी

अकोला : अकोल्यामध्ये धावत्या एसटी बसला आग लागल्याची घटना घडली. अकोल्यातल्या अकोट पोपटखेड रस्त्यावर ही घटना घडली. या आगीमध्ये बस जळून खाक झाली. या बसमधून २० प्रवासी प्रवास करत होते.चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज (२ मार्च) सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली. शहानुर- अकोल अशी एसटी महामंडळाची ही बस आहे.शहानुर इथून ही बस अकोटसाठी प्रवासी घेऊन रवाना झाली होती. पोपटखेड वरून अकोटकडे जात असतानाच याच मार्गावरील बोर्डी फाट्यावर अचानक बसमधून धूर निघत असल्याचे बस चालकाच्या लक्षात आलं. त्यानंतर बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवले. बघता बघता बसने मोठा पेट घेतला.या आगीमुळे बस पूर्णत: जळून खाक झाली. या बसमधून २० प्रवासी प्रवास करत होते.बस चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्वांचे प्राण वाचले.

या आगीची माहिती आकोटच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत पूर्ण बस आगीच्या तावडीत आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बसचे नुकसान झालं.

एसटी बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परंतू बस चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले.

Comments
Add Comment

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुणे : रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात...

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर पाटसजवळ एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सोलापूरहून

अशोक खरातचे ५८ व्हिडीओ कसे समोर आले?, प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिक: राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर