'राहुल गांधी हजर व्हा', नाशिकच्या कोर्टाचे निर्देश

नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी न्यायालयात हजर होऊन स्वतःची बाजू मांडावी. जामीन हवा असेल तर आधी स्वतःचे म्हणणे मांडा नंतर जामीन अर्जावर विचार करता येईल; असे नाशिकच्या कोर्टाने सुनावले. यामुळे काँग्रेसचे लोकसभा खासदार राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात हजर व्हावे लागणार आहे. नाशिकच्या कोर्टाने पुढील सुनावणी ९ मे रोजी ठेवली आहे. या सुनावणीवेळी राहुल यांना नाशिकच्या कोर्टात हजर व्हावे लागणार आहे.



राहुल गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रा काढली होती. राजकीय हेतूने काढलेल्या या यात्रेत वर्धा येथे राहुल यांची सभा झाली. या सभेत बोलताना राहुल यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी सावरकरप्रेमी देवेंद् भुतडा यांनी अॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत नाशिकच्या फौजदारी कोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर सुनावणी झाली त्यावेळी राहुल यांच्यावतीने जयंत जायभावे आणि आकाश छाजेड यांनी युक्तिवाद केला. सुनावणीवेळी राहुल यांच्यावतीने जामीन मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला. या अर्जावर विचार करत राहुल गांधी यांनी कोर्टात हजर होऊन स्वतःची बाजू मांडावी, असे निर्देश कोर्टाने दिले.
Comments
Add Comment

'लाडक्या बहिणी' भडकल्या! कारण काय?

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. लाडकी बहीण

पापलेट उत्पादनात घट का झाली?

मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तलावांचे नियमन - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मत्स्य

पुणेकरांनी लावली महामेट्रोची वाट! गुटखा-पानाच्या तुंबा-यांनी रंगल्या भिंती, जीने आणि गाड्या...

पुणे मेट्रोत हजारो लाइटर, किलोंनी तंबाखू, गुटखा जप्त पुणे : सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या

नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत