Mumbai Weather : सकाळी गारवा, दुपारी उन्हाच्या झळा! पाहा मुंबईत कसे असेल आठवड्याचे तापमान

  125

मुंबई : थंडीचा जोर ओसरत चालला असून उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे कडाक्याची थंडी अनुभवलेल्या मुंबईकरांना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून उकाड्याला सामोरे (Heat) जावे लागत आहे. त्यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या दिवसापासून शहरातील किमान व कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे (Weather Update). त्यामुळे मुंबईकरांना उन्हाचा ताप दुपारच्या वेळी अधिकच जाणवत आहे. अशातच आता हवामान विभागाने (Meteorological Department) आठवड्याभराचा हवामान अंदाज वर्तवला असून यामध्ये मुंबईकरांना (Mumbai Weather) सकाळी काहीसा गारवा तर दुपारी उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार असल्याचे म्हटले आहे.



हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई हवामान आणि वायुमानांकन निर्देशांक २५.९९ °C पासून उष्णतेला सुरुवात झाली असून आज मुंबईचे तापमान २८.९१ °C आहे. तर उद्या मुंबईत अनुक्रमे किमान आणि कमाल तापमान २५.६४ °C आणि २९.०३ °C असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, यावेळी सकाळी ढगाळ वातावरण निर्माण होणार असून दुपारी कडक ऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडताना सनस्क्रीन आणि सनग्लासेस लाऊनच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.



पुढील ७ दिवसांसाठी मुंबईचे हवामान



  • ३ मार्च २०२५ २८.९१ विखुरलेले ढग असणार आहेत.

  • ४ मार्च २०२५ २९.०१ विखुरलेले ढग असतील.

  • ५ मार्च २०२५ २९.८१ ढगाळ वातावरण

  • ६ मार्च २०२५ २९.३३ आकाश निरभ्र राहिल.

  • ७ मार्च २०२५ २९.८५ आकाश निरभ्र राहिल.

  • ८ मार्च २०२५ २९.०० आकाश निरभ्र राहिल.

  • ९ मार्च २०२५ २८.५९ आकाश निरभ्र राहिल.

Comments
Add Comment

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

येत्या ०४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना नोंदवता येणार हरकती, सूचना मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक