वॉशिंग्टन डी. सी. : युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेंस्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये ही घटना घडली. यानंतर अमेरिकेच्या सरकारी अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या शिष्टमंडळला तातडीने व्हाईट हाऊसमधून बाहेर पडण्यास सांगितले. वादामुळे अमेरिका आणि युक्रेनमधील चर्चा फिस्कटली. यामुळे युक्रेनभोवतीचे संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे.
President Donald J. Trump and Vice President JD Vance put AMERICA FIRST. pic.twitter.com/AkAvzKpcpb
— The White House (@WhiteHouse) February 28, 2025
AI Robot : चीनमध्ये एआय रोबोट नियंत्रणाबाहेर, लोकांवर केला हल्ला
फेब्रुवारी २०२२ पासून रशिया आणि युक्रेन यांच्यात लष्करी संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष थांबवा, युद्धबंदी जाहीर करा आणि स्वतःच्या बेचिराख होत असलेल्या देशाला वाचवा असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांना केले. पण युद्धबंदीस स्पष्ट नकार देत लढाई सुरू ठेवण्याची आक्रमक भाषा झेलेंस्की यांनी बोलून दाखवली. यानंतर ट्रम्प आणि झेलेंस्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये शाब्दिक चकमक झाली.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ड्युटी करण्यास पाकिस्तानच्या पोलिसांचा नकार, १०० पोलिसांचे निलंबन
आपला स्वभाव तडजोड करण्याचा नाही. पण रशिया विरुद्धच्या संघर्षात युक्रेनचा विजय होणार नाही या वास्तवाचे भान राखा आणि स्वतःच्या देशाला वाचवण्यासाठी युद्धबंदी करा, असे आवाहन ट्रम्प यांनी केले. हे आवाहन झेलेंस्की यांनी लगेच फेटाळले. यानंतर सुरू झालेली शाब्दिक चकमक थोडा वेळ तशीच सुरू होती. अखेर ट्रम्प यांनी झेलेंस्की यांच्यासोबतची चर्चा थांबवली. यानंतर अमेरिकेच्या सरकारी अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या शिष्टमंडळला तातडीने व्हाईट हाऊसमधून बाहेर पडण्यास सांगितले.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प ट्रान्सजेंडर सैनिकांना ३० दिवसांत सैन्यातून बाहेर काढणार
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांच्या मते व्हाईट हाऊसमध्ये दोन देशांच्या नेत्यांमध्ये टोकाचे वाद होण्याची ही एक दुर्मिळ घटना आहे. झेलेंस्की यांनी वास्तवाचे भान राखले नाही आणि वाद वाढवला तर त्यांच्यासाठी हे राजकीयदृष्ट्या घातक ठरण्याची भीती अभ्यासकांनी व्यक्त केली. ट्रम्प यांनी वाद सुरू असताना एक मुद्दा मांडला. ते म्हणाले की, ‘अमेरिकेने युक्रेनला ३५० अब्ज डॉलर एवढी प्रचंड मदत दिली. लष्करी मदत केली. शस्त्रसाठा दिला. ही मदत दिली नसती तर युक्रेन दोन आठवडे पण लढू शकला नसता.’… ट्रम्प यांनी मांडलेला हा मुद्दा झेलेंस्की यांनी दुर्लक्षून चालणार नाही. युक्रेनच्या ताकदीविषयी झेलेंस्की यांनी गैरसमज करुन घेऊन चालणार नाही; असे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक म्हणाले.