Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ड्युटी करण्यास पाकिस्तानच्या पोलिसांचा नकार, १०० पोलिसांचे निलंबन

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ड्युटी करण्यास पाकिस्तानच्या पोलिसांचा नकार, १०० पोलिसांचे निलंबन

लाहोर : पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी रावळपिंडी आणि लाहोर या दोन शहरांतील स्टेडियममध्ये सामन्यांचे नियोजन आहे. स्पर्धेसाठी स्टेडियम परिसर आणि खेळाडू यांच्या संरक्षणाची जबाबदारी पंजाब प्रांताच्या पोलिसांकडे आहे. पण अनेक पोलिसांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ड्युटी करण्यास नकार दिला आहे.

ICC Champions Trophy 2025: पाकिस्तान, बांगलादेशचा पत्ता कट, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचले भारत आणि न्यूझीलंड

नियमानुसार बंदोबस्ताचे आदेश देण्यात आल्यानंतर ते नाकारणे अथवा ड्युटीवर अनुपस्थित राहणे हा शिस्तभंग आहे. यामुळे पंजाब प्रांतातील शिस्तभंग करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई सुरू झाली आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त पोलिसांचे निलंबन झाले आहे. निलंबित पोलिसांमध्ये वेगवेगळ्या विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे.

AUS vs SA : पावसाचा गोंधळ, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने सेमीफायनलमध्ये रोमांचक स्पर्धा

आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू असताना बंदोबस्ताचे आदेश नाकारणे अथवा ड्युटीवर अनुपस्थित राहणे ही गंभीर बाब आहे. यामुळे लगेच शिस्तभंग करणाऱ्या पोलिसांचे निलंबन करण्याचे निर्देश पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे पोलीस महानिरीक्षक अर्थात इन्स्पेक्टर जनरल (आयजी) उस्मान अन्वर यांनी दिले आहेत. शिस्तभंग केलेल्या प्रत्येक पोलिसाची निलंबनानंतर चौकशी होणार आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईबाबतचे निर्णय घेतले जाणार आहेत.

Champions Trophy: अफगाणिस्तानसाठी वरदान ठरणार पाऊस! सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची सुवर्णसंधी

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५, न्यूझीलंड आणि भारत उपांत्य फेरीसाठी पात्र

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये अ गटातून न्यूझीलंड आणि भारत हे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले आहेत. अ गटातील सर्व संघांनी त्यांचा शेवटचा साखळी सामना खेळणे बाकी आहे. तर ब गटातून अद्याप एकही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झालेला नाही. पावसामुळे एक सामना रद्द झाला आणि ब गटात चुरस निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत. या दोन्ही संघांचा प्रत्येकी एक साखळी सामना व्हायचा आहे. याउलट इंग्लंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांचे शून्य गुण आहेत आणि त्यांचे प्रत्येकी दोन सामने व्हायचे आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -