रायपूर : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील किस्ताराम येथे आज, शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या २ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेय.
#UPDATE | Bodies of 2 naxalites have been recovered with weapons. Search operations are underway: Sukma Police https://t.co/QuYXAyEj2L
— ANI (@ANI) March 1, 2025
सुकमा जिल्ह्याच्या किस्ताराम येथे प्रमुख नक्षलवादी म्होरक्या दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी या परिसरात शोध मोहिम हाती घेतली. यादरम्यान ही चकमक उसळली असून अजूनही नक्षलवादी आणि सैनिकांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून त्यांच्याकडील शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान सुमारे ५०० जवांनी या परिसराला वेढा घातला असून लवकरच दडून बसलेल्या उर्वरित नक्षलवाद्यांवरही कठोर कारवाईची शक्यता आहे.