Saturday, May 16, 2026

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या घटनेनंतर भारताने ऑपरेशन सिंदूर केले. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याना पाकिस्तानला जबर दणका दिला. नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानचे दहशतवाद्यांसाठीचे तळ नष्ट केले. तसेच पाकिस्तानमध्ये सुरू असलेली प्रमुख दहशतवाद्यांची प्रमुख प्रशिक्षण केंद्र पण नष्ट केली. यानंतरही पाकिस्तान पूर्ण सुधारलेला नाही. गुप्तचरांच्या ताज्या अहवालानुसार पाकिस्तान पुन्हा एकदा भारताची कुरापत काढण्यासाठी दहशतवाद्यांना बळ पुरवण्याचे नियोजन करत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एका विशेष कार्यक्रमात भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला. पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा, अशा सूचक शब्दात भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला.

राजधानी नवी दिल्लीत मानेकशॉ सेंटरमध्ये एका संवादात्मक सत्रादरम्यान, गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूरला कारणीभूत ठरलेली परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास भारतीय लष्कर कसा प्रतिसाद देईल, या प्रश्नाला भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सूचक शब्दात उत्तर दिले. मी याआधी जे म्हटले ते तुम्ही ऐकलेच असेल, असे सांगत लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिला. पाकिस्तानने जर दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि भारताच्या विरोधात कारवाया करणे सुरूच ठेवले, तर त्यांना ठरवावे लागेल की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा, असे लष्करप्रमुख म्हणाले.देशाने आणि लष्कराने काही दिवसांपूर्वी ऑपरेशन सिंदूरचा पहिला वर्धापन दिन साजरा केला. यानंतर सेना संवाद या कार्यक्रमात बोलताना लष्करप्रमुखांनी पाकिस्ताना सूचक शब्दात इशारा दिला.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला होता. या घटनेनंतर दहशतवादाचा बंदोबस्त करण्यासाठी भारताने ७ मे २०२५ रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. भारताच्या सैन्याने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये धडक कारवाई केली. दहशतवादी तळ आणि दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्र नष्ट करण्यात आली. नंतर पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानने गंभीर चूक करताच भारताने पाकिस्तानच्या वेगवेगळ्या हवाई तळांवर भेदक हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानच्या काही हवई तळांचे प्रचंड नुकसान झाले.अवघ्या ८८ तासांत भारताने पाकिस्तानला खिळखिळे करून टाकले. अखेर पाकिस्तानने भारताला फोन केला आणि युद्धबंदीची विनंती केली. यानंतर भारताने पाकिस्तानचा युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारला आणि १० मे २०२५ रोजी लष्करी संघर्ष स्थगित झाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >