सोलापूर: जिल्ह्यातील ११ लाख सहा हजार महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यापैकी महिला व बालकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील साडेबारा हजार महिलांची यादी अधिकाऱ्यांना प्राप्त झाली असून त्यांच्याकडील चारचाकी वाहनांची पडताळणी अंगणवाडी सेविका करीत आहेत. त्या साडेबारा हजार महिला लाभार्थींची पडताळणी पूर्ण न झाल्याने जिल्ह्यातील ११ लाख महिलांचा फेब्रुवारीचा लाभ थांबला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख महिलांनी स्वत:च्या मोबाईलवरून अर्ज केले असून त्यांना अंगणवाडी सेविकांनीही मदत केली. तर अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार केल्यावर त्यावर साडेसहा लाख महिलांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केले होते. त्यांना १ जुलैपासून योजनेचा लाभ सुरू झाला, पण आता विधानसभा निवडणुकीनंतर निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी सुरू केल्याने अनेकांची झोप उडाली आहे.
दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे, पण आता फेब्रुवारी संपला तरीदेखील लाडक्या बहिणींना या महिन्याचा लाभ मिळालेला नाही. आता मार्च महिन्यात दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाणार असून तोवर चारचाकी वाहने असलेल्या लाडक्या बहिणींची पडताळणी देखील पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…