बदलापूर - नवी मुंबई बोगदा २०२६ पासून कार्यरत होणार

  192

बदलापूर : बदलापूर पूर्व ते नवी मुंबई हा बोगदा २०२६ पासून कार्यरत होणार आहे. या बोगद्यामुळे बदलापूर ते नवी मुंबई हा प्रवास फक्त २० मिनिटांत करता येईल. हा मार्ग बदलापूरमधील बेंडशील गावाला कल्याण तालुक्यातील रायतेशी जोडेल. यामुळे मुंबई, पालघर आणि पुढे गुजरातपर्यंत रस्ते मार्गाने वेगाने प्रवास करणे शक्य होणार आहे.



बोगद्यामुळे बदलापूरच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. रस्ते मार्गाने प्रवास वेगवान होणार असल्यामुळे बदलापूर आणि आसपासच्या परिसरात औद्योगिक क्षेत्राला तसेच गोदामांशी सेवांना चालना मिळण्याची शक्यता आहे. यातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळेल.

वडोदरा अर्थात बडोदा ते जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे. हा महामार्ग १२० मीटर रुंद आणि १८९ किलोमीटर लांबीचा, आठ लेनचा (मार्गिका) आहे आणि पूर्णत्वाच्या जवळ आहे. नवीन रस्त्यामुळे वडोदरा (बडोदा) आणि मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळ कमी होईल. वाहतुकीचा वेग वाढेल.

दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा लवकरच कार्यरत होणार असल्यामुळे नवी मुंबई आणि पनेवल पट्ट्यातील अर्थचक्राला गती येईल. या भागात उद्योगांना चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई