‘संघर्षाच्या काळात भारत विश्वासू...’

युरोपियन महासंघाच्या अध्यक्षांचे मत


नवी दिल्ली : जगभरात सुरू असलेल्या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर, युरोपियन महासंघाच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन संपूर्ण युरोपियन युनियन सरकारसोबत (कॉलेज ऑफ कमिशनर्स) भारत दौऱ्यावर गुरुवारी पोहोचल्या. त्यांनी दिल्लीतील इंडिया गेटचा फोटो त्यांच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करत भारत दौऱ्याची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी भारताला संघर्षाच्या काळातील विश्वासू मित्र देखील म्हटले आहे.



युरोपियन महासंघाच्या अध्यक्षा उर्सुला यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "माझ्या आयुक्तांच्या टीमसोबत मी दिल्लीत पोहोचले आहे. सध्याच्या संघर्ष आणि तीव्र स्पर्धेच्या युगात तुम्हाला विश्वासू मित्रांची आवश्यकत आहे. त्यामुळे युरोपीयन महासंघासाठी भारत हा एक मित्र आणि धोरणात्मक सहयोगी असल्याचे उर्सुला यांनी म्हटले आहे. तसेच दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी पुढील स्तरावर कशी नेता येईल यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

म्यानमारमधून भारतात येणाऱ्या ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश! घनदाट जंगलाचा रस्ता, नदीतून बोटीचा प्रवास कशी केली कारवाई? जाणून घ्या सविस्तर

गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात

विशेष कारणासाठी पुतिन देणार भारताला भेट! असे असेल पुतिन यांचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’, राजभवन होणार ‘लोक भवन’

नवी दिल्ली : केंद्र सरकार प्रशासकीय रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत असून, सत्ता आणि अधिकार यांची पारंपरिक

भारतीय नौदलप्रमुखांच्या 'त्या' वक्तव्याने पाकिस्तानला भरली धडकी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही बाबी सार्वजनिक करता येत नाही. पण योग्य ती

Bomb Threat : 'बॉम्ब'च्या धमकीने इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : हैदराबादहून कुवैतकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या एका विमानाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी