Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडी'छावा'तील सोयराबाईंच्या डिलीटेड सीनची चर्चा

‘छावा’तील सोयराबाईंच्या डिलीटेड सीनची चर्चा

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमारे १३० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या छावा चित्रपटाने ५४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. सुपरहिट झालेल्या या चित्रपटातील एका डिलीटेड सीनची माहिती प्रसारमाध्यमांच्या हाती आली आहे. सोशल मीडियातही या सीनची चर्चा सुरू झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

प्रसिद्ध अभिनेत्रीचे ३९ व्या वर्षी निधन

‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला त्यावेळी त्यात छत्रपती संभाजी महाराज आणि पत्नीसह लेझीम नृत्य करत असल्याचे एक दृश्य होते. या दृश्यावरुन आक्षेप घेण्यात आले. अखेर नागरिकांच्या भावनांचा मान राखत चित्रपटातून वादाचे कारण ठरलेले लेझीम नृ्त्य काढण्यात आले. यानंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या उत्साहवर्धक वातावरणात अचानक ‘छावा’ चित्रपटातील राजमाता सोयराबाईंच्या एका डिलीटेड सीनची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

घटस्फोट घेणार असल्याच्या वृत्तावर काय म्हणाला बॉलिवूड अभिनेता गोविंदा ?

राजमाता सोयराबाई आणि हंबीरराव मोहिते यांच्यात एक संवाद होताना दिसत आहे. अभिनेता आशुतोष राणा हा हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत आहे तर अभिनेत्री दिव्या दत्ता राजमाता सोयराबाई यांच्या भूमिकेत आहे. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या मुलाला म्हणजेच अकबरला भेटल्यानंतरचे हे दृश्य आहे. यात हंबीरराव हे सोयराबाईंना स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानांची आठवण करुन देतात. यानंतर ते सोयराबाईंच्या उद्दिष्टांबाबत प्रश्न उपस्थित करतात. हा संवाद मनाचा ठाव घेतो. याच कारणामुळे हा सीन व्हायरल होत आहे. सोशल मीडियात या सीनची चर्चा सुरू आहे. दमदार अभिनय, अप्रतिम संवाद… असे असूनही हा संवाद चित्रपटातून का वगळला ? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -