सिंधुदुर्ग : महाशिवरात्रीनिमित्त सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी कुणकेश्वराची पहिली पूजा केली. राज्यातील जनतेवर कृपादृष्टी राहू दे, अशी प्रार्थना पूजा केल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी कुणकेश्वराचरणी केली. जनतेला सुखी ठेव आणि त्यांचे सर्व दुःख हरण कर, अशी विनंती मंत्री नितेश राणे यांनी प्रार्थनेद्वारे कुणकेश्वराला केली. यंदा महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्वराची एक दिवसाची यात्रा सुरू आहे. भाविकांची या यात्रेला प्रचंड गर्दी झाली आहे. भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात यात्रा सुरू आहे.
कुणकेश्वर हे भारतातील महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले एक गाव आहे. ते देवगड गावाच्या दक्षिणेस २० किलोमीटरवर आहे. कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे. तसेच हे गाव ‘हापूस आंब्या’साठी प्रसिद्ध आहे. कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे. छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी म्हणले जाते. दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने जत्रेचे आयोजन केले जाते. कलिंगडांचा बाजार आणि मालवणी खाजे हे या जत्रेचे खास वैशिष्ट्य आहे. या यात्रेला येणाऱ्या सर्व देवस्वाऱ्या काही अपवाद वगळता अजूनही आपल्या गावरयतेसहित पायी चालत येतात. कुणकेश्वर मंदिराजवळच समुद्रकिनारा आहे. येथे दरवर्षी लाखोच्या संख्येने देशी व विदेशी पर्यटक भेट देतात. समुद्रातील जांभ्या दगडांवर सुमारे १०० शिवलिंगे कोरलेली आहेत. ओहटीच्या वेळी ही शिवलिंगे पाहायला मिळतात. कुणकेश्वर गावातील एका डोंगरात जांभ्या दगडात एक गुहा आहे. या गुहेत शिवलिंग, नंदी, तसेच स्त्री-पुरुषांचे अनेक दगडी मुखवटे आहेत. हे बघण्यासाठीही पर्यटक गर्दी करतात.
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…